पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune PMPML Administration | पीएमपीएमएल प्रशासनाने स्वारगेट (Swargate) आणि मार्केटयार्ड (Marketyard) परिसरातून मुळशी तालुक्यात (Mulshi Taluka) जाणारे 11 मार्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गुरूवारी घेतला आहे. गुरूवारपासून ही सेवा पुर्ववत करण्यात आल्यामुळे तालुक्यातील नोकरदार, विद्यार्थी तसेच शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. (Pune PMPML Administration)
यापुर्वी मार्केटयार्ड येथून मुळशी तालुक्यातील वेगवेगळया मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व बस या कोथरूड डेपोमधून सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे मार्केट यार्ड येथे शेतमाल घेऊन येणार्या शेतकर्यांची तसेच स्वारगेट परिसरातील कामानिमित्त येणार्यांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत होती. त्या गाडया पुर्ववत कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) यांनी काही दिवसांपुर्वीच केली होती. त्यानुसार ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. (Pune PMPML Administration)
खालील मार्गावर पीएमपीएमएल सेवा पुन्हा सुरू झाली आहे
मार्केटयार्ड – खोटावडे गाव – मुगावडे, माकेटयार्ड – मालेगाव (शेडाणी फाटा), मार्केटयार्ड – उरावडे गाव (मारणेवाडी), मार्केटयार्ड – खारावडे (लव्हार्डेगाव), स्वारगेट – काशिंगगाव कमान, स्वारगेट – बेलावडे, मार्केटयार्ड – पौडगाव शासकीय वसतिगृह, मार्केटयार्ड – कोळवणगाव, स्वारगेट – भादसगाव, मार्केटयार्ड – भादसगाव आणि मार्केटयार्ड-खांबोळी (कातरखडक).
Web Title : Pune PMPML Administration | 11 routes from PMPML to Mulshi taluka from Swargate and Marketyard areas are re-opened
- Sand Mafia Crushed Policeman | वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं
- IAS Dr. Anil Ramod Suspension | लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोडवर लवकर निलंबन कारवाई
- Pune Crime News | पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देणार्याला अटक
- Akashvani Pune | ‘आजच्या ठळक बातम्या’ पुण्यातूनच प्रसारित होणार, प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती