नीरा : बहुजननामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील नीरा नजिक असलेल्या थोपटेवाडी येथील ८६ वर्षीय आजींनी अवघ्या सहा दिवसांंत इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करून त्या घरी परतल्या. नीरेतील डॉ.रोहन लकडे यांच्या जीवनदीप हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत होत्या. डॉ.लकडे यांनी यशस्वी उपचार केल्यामुळे आजींच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.
नीरा नजिकच्या थोपटेवाडी (ता.पुरंदर) येथील ८६ वर्षीय आजींना दम लागणे, अस्वस्थ वाटणे असा त्रास होत होता. त्यांच्या फँमिली डॉक्टरांनी कोरोना तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. मागील आठवड्यात त्यांनी लोणंदच्या खाजगी लँबमध्ये कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आजींना नीरा येथील जीवनदीप हॉस्पिटल अँन्ड क्रिटीकेअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉ. रोहन लकडे यांनी व त्यांच्या टिमने गेल्या सहा दिवसांत ८६ वर्षीय आजींवर यशस्वी उपचार केल्यामुळे आजींनी कोरोनावर मात केली. शनिवारी ( दि.२२) त्यांना घरी सोडण्यात आले.
यशोधा थोपटे (वय ८६) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर १७ मे रोजी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. शनिवारी २२ मे रोजी दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. थोपटे आजींचा आदर्श इतर रुग्णांनी घ्यावा असे सांगुन कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर लोक भिती घेत पुर्ण खचुन जातात व धडधाकट असलेली व्यक्तीही गंभीर होते . त्यामुळे रूग्णांनी घाबरून न जाता आजाराला धीराने सामोरे जावे, असे मत डॉ. रोहन लकडे यांनी व्यक्त केले.