सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – अनु.जाती व बौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी सन २०१८ -१९ दलित वस्ती सुधार योजनेसाठी माळशिरस तालुक्यासाठी सहा कोटी ९५ लाखांच्या निधीला मंजूरी मिळाल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील व उपसभापती किशोर सूळ यांनी दिली.
त्यामध्ये कॉक्रिट रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालय, पाणी पुरवठा योजना हायमास्ट दिवे, एलईडी दिवे, डांबरी रस्ते, खडीकरण रस्ते या कामासाठी ६ कोटी ९० लाख ५० हजार रूपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
तालुक्यातील इस्लामपूर, अकलुज, आनंदनगर, बाभुळगांव, बचेरी, बागेचीवाडी, बांगार्डे, बिजवडी, बोरगांव, चांदापुरी, चौंडेश्वरवाडी, दहिगांव, धर्मपुरी, डोंबाळवाडी (कु), फडतरी, फोंडशिरस, गणेशगांव, गारवाड, गिरझणी, हणुमानवाडी, जाधववाडी, कचरेवाडी, कदमवाडी, कारूडे, खंडाळी, खुडूस, कोंडबावी, कोथळे, कुरभावी, कुसमोड, लोणंद, लोढे मो.वाडी, महाळुंग, माळेवाडी (अकलूज), माळीनगर, माणकी, मारकडवाडी, मिरे, मोरोची, नातेपुते, नेवरे, पळसमंडळ, पानीव, पठाण वस्ती, पिसेवाडी, पुरंदावडे, रेडे, सदाशिवनगर, संगम, संग्रामनगर, तांबवे, तरंगफळ, तिरवंडी, उघडेवाडी, उंबरे द., वेळापूर, वाघोली, येळीव, यशवंतनगर असा माळशिरस तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेसाठी सहा कोटी ९० लाख ५० हजार रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील व उपसभापती किशोर सुळ यांनी दिली.