बहुजननामा ऑनलाइन : ऑगस्ट महिना संपणार असून सप्टेंबर महिन्याला सुरूवात होणार आहे. याच नवीन महिन्याच्या सुरुवातीसह बरेच काही बदल घडणार आहेत. १ सप्टेंबरपासून आपल्याला काही महागड्या वस्तू मिळणार असतील,पण त्यासोबतच अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. सप्टेंबरमध्ये अनेक आर्थिक नियम लागू होणार आहेत.
ह्या गोष्टी होणार स्वस्त :
गृह कर्ज होणार स्वस्त :
सप्टेंबरच्या पहिल्या तारखेपासून एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्र यासह अनेक बँका घर खरेदीसाठी स्वस्त कर्ज देणार आहेत. एसबीआयने गृहकर्ज व्याज दरात ०. २० टक्क्यांनी कपात केली आहे. त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रने सांगितले की, रिटेल कर्जाच्या व्याज दराला रेपो दराशी जोडल्यास बँका व्याजदराशी संबंधित लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. रेपो दरात कर्जाचा व्याज दर जोडल्यानंतर जेव्हा आरबीआयने रेपो दर बदलला तेव्हा कर्जाचे व्याज दरही बदलतील. १ सप्टेंबरपासून एसबीआयच्या गृह कर्जावरील व्याज दर ८.०५ टक्के राहील. ऑगस्टमध्येच आरबीआयने रेपो दर ५. ४० टक्क्यांवर आणला आहे.
वाहन कर्जाचे दरही खाली येणार :
सणाच्या हंगामाच्या दृष्टीने एसबीआयने वाहन कर्जावर एक खास ऑफर देऊ केली आहे, ज्याद्वारे वाहन कर्जे स्वस्त होतील. एसबीआयच्या डिजिटल प्लॅटफॉर्म योनो किंवा वेबसाइटमार्फत कार कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना व्याज दरामध्ये ०.२५ टक्के सवलत मिळेल. पगारदार ग्राहक कारच्या ऑन-रोड किंमतीच्या ९० टक्के पर्यंत कर्ज घेण्यास सक्षम असतील.
एसबीआय देईल सव्वा कोटीपर्यंत शैक्षणिक कर्ज :
१ सप्टेंबरपासून शैक्षणिक कर्जाचा व्याज दर ८. ४० टक्क्यांऐवजी ८. २५ टक्के असेल. हा दर देशातील अभ्यासासाठी ५० लाख रुपयांपर्यंत आणि परदेशातील अभ्यासासाठी १.५ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर लागू असेल. पैसे भरण्यासाठी ग्राहकांना जास्तीत जास्त १५ वर्षांचा अवधी मिळेल.
स्वस्त दराने वैयक्तिक कर्ज :
सणासुदीच्या काळात आपल्या गरजांत वाढ होते, त्याचप्रमाणे पैशांची आवश्यकता देखील वाढते. स्वस्त दराने २० लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देण्याचा दावा एसबीआयने केला आहे. कर्ज ६ वर्षांच्या कालावधीसाठी ११.९० टक्के ऐवजी १०. ७५ टक्के दराने दिले जाईल. पगाराच्या खात्यासह ग्राहकांना योनोद्वारे प्री -अप्रूव्ड कर्जाची ऑफर ५ लाखांपर्यंत मिळेल.