नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकेकाळी आपल्या संपत्तीमुळे भारत सुवर्ण पक्षी म्हणून ओळखला जात असे, म्हणले जात असे की भारतातून सोन्याचा धूर निघतो. परंतु वेळ बदलत गेली, भारतावर अनेकांनी आक्रमण केली, राज्य केले, आणि सोनं लुटून नेले. मात्र सोनभद्र जिल्ह्यात मिळालेल्या तब्बल १२ लाख कोटी रुपयांच्या किंमतीचे ३,३५० टन सोन्याने पुन्हा एकदा भारताची अपेक्षा वाढवली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते सध्या भारताकडे तब्बल ६२६ टन सोन्याचे भंडार आहे, तर सोनभद्र जिल्ह्यात मिळणारे सोने त्यापेक्षा ५ पट जास्त आहे. आता असे मानले जात आहे की सोन्याच्या साठ्यासाठी भारत जगातील टॉप –१० मधील देश आहे. भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षणात या पर्वतीय प्रदेशात तीन हजार टन पेक्षा जास्त सोनं असल्याचा अंदाज उपस्थित केला गेला आहे. सर्वेक्षणात सोनाभद्रच्या पर्वतीय प्रदेशात सोन्याशिवाय, लोखंड आणि इतर खनिजे उपलब्ध आहेत. सध्याच्या सोन्याच्या तुलनेत या सोन्याचे मूल्य तब्बल १२ लाख कोटी रुपये आहे.
भारताजवळील सोन्याचे साठे
वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या अहवालानुसार भारतासह जगभरातील मध्यवर्ती बँका सोने खरेदी करीत आहेत. अहवालात असे म्हटले आहे की सलग दहाव्या वर्षी मध्यवर्ती बँकांनी खरेदी केली आहे. सन २०१९ मध्ये जगातील १५ केंद्रीय बँकांनी ६५०.३० टन सोने खरेदी केले. त्यापूर्वी, ६५६.२ टन सोने खरेदी केले गेले. डब्ल्यूसीजीच्या अहवालात म्हटले आहे की, २०१० ते २०१९ दरम्यान जगभरातील मध्यवर्ती बँकांत तब्बल ५,०१९ टन सोनं खरेदी करण्यात आली म्हणजे दरवर्षी ५०० टन सोनं खरेदी केलं. यापूर्वी दशकभरात ४४३ टन सोनं खरेदी केले गेले आहे. जर सोप्या शब्दात सांगायचे दर वर्षाला ५७ टन सोनं जास्त खरेदी केलं गेलं आहे.
जगातील सर्वात जास्त सोन्याचे भांडार अमेरिकेत असून ८,१३३ टन सोनं त्यात जमा आहे. जे त्यांच्या एकूण परदेशी चलनाच्या ७६.९ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी, जर्मनीकडे एकूण ३३६६.८ टन सोनं आहे. तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. ज्यांच्याकडे २४५१.८ टन सोनं आहे, जे त्यांच्या एकूण मूल्याच्या ६८.४ टक्के आहे. त्यांच्या एकूण परदेशी चलनाच्या मुद्रेचे भंडार ७३ टक्के आहे. तर फ्रान्स चौथ्या स्थानी आहे. त्यांच्याकडे एकूण २,४३६ टन सोनं आहे. वर्ल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार रशिया पाचव्या क्रमांकावर आहे. रशियाकडे २२४१.९ टन सोनं आहे, ते परदेशी चलनाच्या २०.२ टक्के आहे. सहाव्या क्रमांकावर आहे चीन, चीनकडे १९४८.३ टन सोनं आहे, जे परदेशीच्या चलनाच्या २.९ टक्के आहे. सातव्या स्थानी आहे स्विझर्लंड, त्यांच्याकडे १,०४० टन सोनं आहे. आठव्या स्थानी आहे जपान, जपानकडे ७६५.२ टन सोनं आहे, जे परदेशी चलनाच्या २.८ टक्के आहे. तर भारत नव्या स्थानी आहे, भारताकडे ६२६ टन सोनं जमा आहे.