परभणी : बहुजननामा ऑनलाइन – शहरातील बुध्द विहार परिसरात गुरूवारी (दि.३१) व शुक्रवारी (१ फेब्रुवारी) दोन दिवसीय बौध्द धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो यांनी दिली.
गुरूवारी पहाटे ५.३० वाजता बुद्धविहार पूर्णा येथे परित्राण पाठ व बुध्द वंदना होईल. सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ध्वजारोहण करण्यात येईल. १०.३० वाजता बुध्द विहारात ध्वजारोहण करण्यात येईल. सामूहिक वंदना पूजा संपन्न होईल. त्यानंतर डॉ. आंबेडकरनगरात दुपारी १२ वाजता भगवान बुध्द, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पूर्णा शहरातून भिक्खू संघासह धम्म मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी १.३० वाजता परिषदेचे उद्घाटन भदंत के संघरक्षित महाथेरो, झारखंड यांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो राहणार आहेत. लुंबिनी स्मरणिकेचे प्रकाशन बोधीपालो महाथेरो चौका यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रथम सत्र धम्मदेशना द्वितीय सत्र धम्मदेशना होईल व शुक्रवारी दुपारी १ वाजता प्रथम सत्र धम्मदेशना, व्दितीय सत्र धम्मदेशना होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, डॉ. एस. पी. गायकवाड, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांची उपस्थिती राहणार आहे. या धम्म परिषदेचा लाभ उपासक-उपासिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.