बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या ( Corona ) काळात लॉकडाउन ( Lockdown) असल्यामुळे वीज ( Electricity) ग्राहकांना मदत करण्यासाठी तसेच वीज बिल ( electricity bill) भरण्यास प्रोत्साहित करून थकबाकी वसुलीसाठी बेस्टकडून ( BEST) वीज ग्राहकांना बिलात दाेन टक्क्यांची सूट ( Discount) देण्यात आली आहे. बेस्टकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेस्टने ग्राहकांना २ पर्याय दिले आहेत.
पर्याय १ : वीज ग्राहकाने नोव्हेंबर महिन्याचे वीज बिल तत्काळ भरले, तर त्यास एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावरील प्रदान आकार आणि वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येईल. तसेच एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या वीज वापराच्या बिलात २ टक्के सूट देखील देण्यात येईल.
पर्याय २ : नोव्हेंबरचे वीज बिल नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये भरल्यास एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावर विलंब शुल्क आणि व्याजात सूट देण्यात येईल. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या वीज वापराच्या बिलावर १ टक्का सूट देण्यात येईल.
पुढील बिलात काय होणार समाविष्ट
जर बिलाचे तिन्ही हप्ते वेळेत भरले तर व्याजा ( Interest) मध्ये सूट देण्यात येईल. ग्राहकांनी हफ्ता भरला तरच तो त्यावरील सूट मिळविण्यास पात्र राहील. ती सूट पुढील बिलात समाविष्ट करण्यात येईल. तसेच, ज्यांनी वेळेत बिले भरली आहेत त्यांना सुद्धा बिलात २ टक्के सूट देण्यात येईल.