बहुजननामा ऑनलाइन – दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलीस सेवेतील 16 अधिकार्यांना (police officers) भारतीय पोलीस सेवेत(आयपीएस) संवर्ग पदोन्नती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश निर्गमित केल्यामुळे अधिकार्यांना(police officers) मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य पोलीस सेवेत अधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) पदोन्नती होते. त्यासाठी राज्य कोटयातील 2017 आणि 2018 तसेच संवर्गात वाढलेल्या अशा आयपीएसच्या एकूण 16 जागांसाठी सेवाज्येष्ठतेनुसार 51 पात्र अधिकार्यांच्या प्रस्तावाची यादी गृह विभागाने लोकसेवा आयोगास पाठविली होती. आयपीएस म्हणून पदोन्नती मिळालेल्या या अधिकार्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये सन 2017च्या तुकडीमध्ये एस. जी. वायसेपाटील, ए. एम.बारगळ, एन. टी. ठाकू र, एस. एल. सरदेशपांडे, नितीन प्रभाकर पवार, डी. पी. प्रधान यांचा समावेश आहे. तर सन 2018च्या तुकडीमध्ये एम. एम. मोहिते(शीला डी सैल), पांडुरंग पाटील, टी.सी दोशी, डी.बी पाटील(वाघमोडे), एस.एस. बुरसे, सुनीता साळुंखे- ठाकरे, एस. एन.परोपकारी, एस. एस. घारगे, रवींद्रसिंग परदेशी आणि पुरुषोत्तम कराड यांची निवड झाली आहे.