मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बेरोजगार शिक्षकांसाठी मोठी खुशखबर आहे . शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पवित्र वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. या माध्यमातून राज्यातील तब्बल १०हजार १ शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
यामध्ये अनुसूचित जाती-१ हजार७०४ , अनुसूचित जमाती- २हजार १४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५ व्हि. जे. ए.- ४०७, एन. टि. बी.-२४०, एन. टी. सी- २४० एन. टी. डी.- १९९, इमाव- १ हजार ७१२, इ. डब्ल्यू. एस- ६४०, एस. बी. सी.-२०९, एस. ई. बी. सी.- १ हजार १५४, सर्व साधारण- ९२४ या संवर्गातील जागांचा समावेश आहे.
पवित्र पेार्टलच्या माध्यमातून ऑनलाईन तसेच भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश येणार आहे.
अर्ज करताना विद्यार्थ्यांनी पोर्टलवरील माहिती नीट ,व्यवस्थित वाचावी, कोणीही गडबड गोंधळ करू नये ,जेणेकरुन फॉर्म भरताना चुका टाळता येतील .अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या टीमने खूप परीश्रम करुन काम पूर्ण केले आहे.