अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – सकल माळी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार व गुणगौरव सोहळा नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर स्वामी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाली नवल, प्रमुख अतिथी अरविंद पोहरकर, ममता सुंदरकर, बाळासाहेब खाजबागे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कॅन्सर तपासणी शिबिराला आर्थिक मदत देणारे सचिन कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता १२ वी मधून प्रथम वैष्णवी सुनील खवले, द्वितीय महिमा सुभाष आमले, तृतीय दिव्या नरेंद्रसिंग पवार, इयत्ता १० वी मध्ये साक्षी भाकरे प्रथम, पायल यावले, द्वितीय भारतीय गायकवाड, तृतीय तसेच इयत्ता १० वी उर्दू मधून प्रथम तसमीया आफरीन फारूक अली, द्वितीय सायमा परविन सलीम शाह, तृतीय सुफीयान शाह रहेमान शाह यांचा रोख रक्कम स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सकल माळी समाजाचे अध्यक्ष उद्धव गणोरकर, सचिव सुनील डेहणकर, गजानन नवले, राहुल मंगळे, विजय डेहणकर, अतुल खोडस्कर, नाना बनकर, नीलेश भोजने, प्रशांत पोहरकर, राम श्रीखंडे, नंदू फसाटे, किशोर वासनकर, सचिन कोकाटे, आकाश डहाके, उमेश भेले, प्रकाश आजनकर, रामचंद्र गायकी, रमेश कळसकर, प्रफुल्ल नवले, अमोल नवले, अमोल डहाके, अंकुश दुर्गतारे, दुर्गेश भेले, पंकज राऊत, सागर बानेवार, पंकज पाचघरे, रामदास वडनेरकर, आकाश डहाके, अरुण गोवाडे, ऋषिकेश डहाके, सविता खोडस्कर, सरिता डेहणकर, प्रणिता नवले, विजया फसाटे यांची उपस्थिती होती. संचालन निकिता चांदूरे हिने केले. निलीमा तायवाडे यांनी आभार मानले.