बीड : बहुजननामा ऑनलाइन – समाजाच्या शेवटच्या घटकाला योग्य प्रवाहात आणून त्यांना योग्य ते स्थान देण्याचे काम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून करण्याचे माझे ध्येय असल्याचे मत माजी मंञी बबनराव घोलप यांनी माजलगाव येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मेळाव्यात व्यक्त केले.
पुढे बोलताना घोलप म्हणाले, समाजाला आणि समाज बांधवांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आज सर्वांना सोबत घेऊन पुढे चालत असून अविरत समाजाची सेवा करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन जगताप, भानुदास विसावे, दिलीप काकडे राष्ट्रीय महिला सचिव सरोजिनी बिसुरे, प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके, मराठवाडा युवती अध्यक्ष सुनीता नेटके, मराठवाडा अध्यक्ष प्रभावती अन्नपूर्णे, बचुटे, रविंद्र बोराडे, नारायण चांदबोधले, विलास बामणे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.