अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र बहुजन सेना, बहुजनवादी सामाजिक संघटना व आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना तसेच विविध जाती उपजाती समुहांच्या संयुक्त विद्यमाने २१ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांकरिता साखळी उपोषण करण्यात येत आहे.
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचे ऋणमोचन येथे राष्ट्रीय स्मारक त्वरीत मंजूर करण्यात यावे, बारा-बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, जि.प. व मनपा संकुलमध्ये नाभिक समाजाला आरक्षण देण्यात यावे, एमआयडीसी व विमानतळ विकास प्राधिकरणच्या कामांवर स्थानिक मजुरांना प्राधान्य देण्यात यावे आदी मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहे.
पत्रपरिषदेत संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर सागर, संजय नांदणे, संघदिप घुगरे, मिलिंद वाघळे, समाधान वानखडे, सुरेश दहीकर, वंदना तळखंडे आदी उपस्थित होते.