बिलोली : बहुजननामा आॅनलाइन – देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आ. सुभाष साबणे यांनी देगलूर येथिल शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेबरोबर आपली प्रतिमा लावलेले फोटो लावले होते. हे फोटो सोशल मिडीयावर शेअर झाले असता या कृत्याचे विविध वर्तमानपत्रात वृत्त प्रकाशित होताच या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केले जात आहे.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन बिलोली तालुक्यातील सामाजिक राजकिय संघटनांनी गुरुवार दि १३ डिसेंबर रोजी आ. साबणेच्या त्या कृत्याचे प्रशासनास निवेदन देऊन निषेध करण्यात येत आहे. आ. साबणे त्यांच्या कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांबरोबर आपली प्रतिमा लावून नागरिकांना आपण महापुरुष आहोत असे दाखवत आहेत काय ? असा प्रश्न राज्यात चर्चेले जात आहे. विविध सामाजिक राजकिय संघटनांनी दिले निषेधाचे निवेदन दिले.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आ. सुभाष साबणे यांनी केलेल्या त्या कृत्याने बहुजन समाजाच्या भावना दुखावले गेल्या असून महापुरुषांचा अवमान झाला आहे या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पोवाडे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या वतिने निषेधाचे निवेदन प्रशासन देण्यात आले.
युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास पा. शिंदे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सुलेमान शेख यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयासमोर आ. साबणे विरोधात नारेबाजी करून निषेधाचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. एआयएमआयएम पक्षाचे बिलोली तालुकाध्यक्ष साजिद कुरेशी यांनी सुध्दा या घटनेचे निवेदनाद्वारे निषेध करण्यात आले. लोकस्वराज्य आंदोलन चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निषेधाचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या (BRSP) वतिने देगलूर-बिलोली विधानसभा अध्यक्ष सुनिल जेठ्ठे, प्रकाश फुगारे यांनी सुध्दा निषेधाचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. टायगर ग्रूप महाराष्ट्र शाखा बिलोलीच्या वतिने तालुकाध्यक्ष नागेश माचापुरे यांनी सुध्दा आ. साबणेंच्या त्या कृत्याचे निवेदनाद्वारे निषेध केला.