जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – गेल्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी आझादी महोत्सव समितितर्फे परिवर्तन चौक मुक्ताईनगर येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्ष मुक्ताईनगर तालुका आणि सर्व समाज यांच्यावतीने सरचिटणीस संदिप देशमुख यांनी माजी महसूल व कृषी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्याकडे मुक्ताईनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार नगर पंचायतच्या प्रथम मासिक सभेत ठराव घेण्यात येवुन पुतळा समिती गठित करण्यात आली आहे व सर्व परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कार्यक्रमात आ. एकनाथ खडसे यांनी ही मागणी तत्काळ मान्य करत परिवर्तन चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणीसाठी तिथे उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष नजमा तडवी आणि सर्व नगरसेवक यांना नगरपंचायतच्या प्रथम मासिक सभेत त्या संबंधी ठराव घेऊन पुतळा उभारणी समिती गठित करून सर्व परवानग्या मिळविण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नगर पंचायतच्या प्रथम मासिक सभेत ठराव घेण्यात येवुन पुतळा समिती गठित करण्यात आली आहे व सर्व परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आ. खडसे यांच्या समोर औरंगाबाद येथील शिल्पकार नरेंद्र साळुंखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळ्याचे मॉडेल सादर केले. यावेळी पुतळा निर्माण समिती अध्यक्ष संदिप देशमुख, नगरपंचायत मुख्याधिकारी श्याम गोसावी, माजी सरपंच प्रवीण पाटील, रामभाऊ पाटील, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते.