कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – कागल तालुक्यातील आलाबाद येथील मराठा व मुस्लिम समाजाच्या कुटुंबांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. कागल तालुक्यात भारिप बहुजन महासंघाच्या चळवळीच्या कामात आजपर्यंत मराठा, मुस्लिम समाज येत नव्हता. पण, आलाबाद येथील बाबूराव जाधव यांनी आपल्या कुटुंबासमवेत या संघटनेत प्रवेश केला आहे.
साधना सागर जाधव यांनी पक्षात मराठा समाजातील अडचणी सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या समवेतच मुस्लिम समाजातील कुटुंबानेही प्रवेश केला आहे. या प्रवेशाने मराठा, बौद्ध, मुस्लिम, मातंग, चर्मकार, धोबी, साळी, माळी, कोळी, भटके व इतर जातीजमाती एक आहेत हे दाखवून दिले आहे. हिंदू, मुस्लिम व बौद्ध या जातीमध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना हा प्रवेश म्हणजे एक चपराकच बसली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष बाळासोा कांबळे, कागल तालुका महिलाध्यक्ष स्मिता कांबळे, जिल्हा संघटक संतोष गायकवाड, कागल तालुका संपर्कप्रमुख अनिल कांबळे, तालुका संघटक अमोल कांबळे, संभाजी गायकवाड, मन्सूर देसाई, मुक्तार देसाई, विनायक कांबळे, जयराम कांबळे, रोहित कांबळे, शहाजी कांबळे, सज्जन कांबळे, जानू कांबळे, विकास कांबळे, मोहसीन देसाई आदी उपस्थित होते.