अकोला : बहुजननामा ऑनलाईन – शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्यामुळे बहुजनांची मुले शिक्षणात प्रगतीपथावर आहेत. यावेळी अनेक मान्यवरांनी भाऊसाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जयंती उत्सव आयोजित कार्यक्रमाच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभात अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराव खोटरे होते, तर उपस्थितीमध्ये सुखराम आखरे, सुरेश आढे, दयालसिह बलोदे, सुहास कराळे, सुधीर देशमुख, किसनराव बोडखे, गजानन भारसाकळे, डी.आर. वानखडे, अंकेश भाबुरकर, शांतीकुमार सावरकर, जितेंद्र देशमुख, तेजराव कडू, रवींद्र ताथोड, राधाताई काळे, शे. असरफ, कविता तायडे हे उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष ढोले यांनी केले आहे.
कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी संचालन मंगला थोटे, प्रेरणा कराळे, तर आभार विद्या देशमुख यांनी मानले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. श्री शिवाजी हायस्कूल व श्रीमती पार्वतीदेवी तापडिया कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आ. संजय कुटे यांनी भाऊसाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यकारी सदस्य तथा अध्यक्ष शाळा समिती तेल्हारा केशवराव मेतकर हे होते. अतिथी म्हणून अनिल गावंडे, सहदेवराव भोपळे, दादासाहेब पाटील, साहेबराव सोनमाळे, डॉ. विलासराव भाबुरकर, अण्णासाहेब ढोले, सुरेशदादा खोटरे, बाळासाहेब माकै, ॲड. विश्वासराव नेरकर, रमेश कोकाटे, सुरेश तराळे, किसनराव बोडखे, सुधीर देशमुख, डॉ. अशोक बिहाडे, डॉ. अशोक तापडिया, सुदेश शेळके, रामाभाऊ फाटकर, गजानन भारसाकळ यांच्यासह माता पालक उपस्थित होते. प्रास्ताविक शांतीकुमार सावरकर यांनी केले. शाळेतील प्रगती आढावा मुख्याध्यापक सुभाष ढोले यांनी माडला.