बहुजननामा ऑनलाइन टीम – आर्थिक मंदीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली आहे. त्यात कोरोनामुळे तर आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे.(egg costs Rs 30 in Pakistan) भारताचा कायम विरोध करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या अंत्यंत बिकट आहे. अन्न धान्यासहा अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तानमधील ‘द डॉन’ या वृत्तपत्रातील बातमीनुसार लाहोर जिल्हा प्रशासनाने अंड्यांचे दर १९७ रुपये डझनपर्यंत पोहचले आहेत. तर खुल्या बाजारामध्ये अंडी २१६ रुपये डझन किंमतीने मिळत आहेत. देशभरामध्ये अंड्यांचे दर हे २०० ते २४० रुपये प्रती डझनच्या दरम्यान आहेत. हे दर रविवारचे आहे. केवळ अंडीच नाही तर भाजाही महाग झाल्या असून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानमध्ये एक किलो आल्याची किंमत एक हजार रुपयांपर्यंत गेली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे लग्न सोहळे आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत असले तरी मांस आणि अंड्यांचे दर वाढत आहे. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाल्याचे पोल्ट्री मालक सांगतात. लॉकडाऊनमध्ये हॉटेल आणि कार्यक्रम बंद असल्याने मागणीच नव्हती त्यामुळे आता अनेक पोल्ट्री बंद झाल्यात. हळूहळू मागणी वाढत असली तरी त्या प्रमाणात पुरवठा नसल्याने किंमत वाढल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हिवाळ्याच्या कालावधीमध्ये अंड्यांची मागणी वाढली असतानाच दरही वाढलेत. एक डझन अंड्यांची किंमत २१६ रुपये इतकी आहे. अंड्यांचे दर वाढल्याने सामान्यपणे शहरांमध्ये एक डझन अंडी खरेदी करणारी लहान कुटुंब आता दोन ते सहा अंडी खरेदी करत आहे.
पाकिस्तानच्या इतिहासामध्ये हे अंड्यांचे सर्वाधिक दर आहेत. सध्या ३० डझन अंड्यांची किंमत ही पाच हजार ८५० रुपये इतकी आहे. दोन महिन्यांपूर्वी ३० डझन अंड्यांची किंमत साडेचार हजार रुपये इतकी होती, असे पोल्ट्री होलसेलर्स असोसिएशनचे महासचिव कमाल अख्तर सिद्दीकी यांनीम्हंटले आहे.दरम्यान कराचीमधील एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार सामान्यपणे थंडीच्या कालावधीमध्ये एक अंडं १२ ते १३ रुपयांना विकलं जातं. मात्र यंदा हे दर खूपच वाढलेत.
धान्यांच्या किमतीवरही परिणाम
पाकिस्तानमध्ये केवळ मांस आणि अंड्यांचे दर वाढलेत असे नाही तर धान्यांच्या किंमतीवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. ४० किलो गव्हासाठी दोन हजार ४०० रुपये मोजावे लागत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये गहू ६० रुपये किलो दराने विकला जातोय. त्याचबरोबर देशामध्ये गॅसचा पुरवठा हा मागणीपेक्षा कमी आहे. त्यामुळे गॅस संकटही उदभवू लागले आहे.
पाकिस्तानमध्ये केवळ मांस आणि अंड्यांचे दर वाढलेत असे नाही तर धान्यांच्या किंमतीवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. ४० किलो गव्हासाठी दोन हजार ४०० रुपये मोजावे लागत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये गहू ६० रुपये किलो दराने विकला जातोय. त्याचबरोबर देशामध्ये गॅसचा पुरवठा हा मागणीपेक्षा कमी आहे. त्यामुळे गॅस संकटही उदभवू लागले आहे.
योग्य वेळी सरकारने गॅस खरेदीबद्दल ठोस निर्णय न घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे येथील प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.