यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समता मैदान यवतमाळ येथे १६ जानेवारीला जाहीर सभा होणार आहे. या सभेला ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, एमआयएमचे अध्यक्ष असुउद्दीन ओवेसी मार्गदर्शन करणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विश्रामगृहात भारिप बहुजन महासंघाचे बालमुकुंद भिरड यांनी आढावा घेतला.
या सभेला यवतमाळ जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे, जिल्हा प्रवक्ता उत्तम पांडे, जिल्हा महासचिव राजा गणवीर, मंगल तेलंग, प्रमोद राऊत, प्रकाश देवपारे, बळवंत मनवर, विशाल पोले, यवतमाळ तालुकाध्यक्ष सचिन शंभरकर, यवतमाळ शहराध्यक्ष मामासाहेब उर्फ दिनेश करमनकर, माजी जिल्हाध्यक्ष खंडेश्वर कांबळे, राजेंद्र तलवारे, माजी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय गायकवाड, उमरखेड तालुका अध्यक्ष डॉ. वाठोरे, ज्येष्ठ नेते भास्कर पंडागळे, लक्ष्मण पाटील, अशोक शेंडे, निरंजन खडसे, गुणवंत मानकर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवी भगत यांच्यासह जिल्हा महिला आघाडीच्या करुणा मून, धम्मावती वासनिक, पूजा खंतडे, ज्योती वागदे, योगीता खमडे, वंदना तायडे आदी उपस्थित होते.
संचालन शिवदास कांबळे यांनी केले तर आभार प्रसन्नजित भवरे यांनी मानले.