मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिलमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्र्याच्या भेटी नंतर त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे म्हंटले आहे.
रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिलमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने कमी करून शिवाजी पार्कमध्ये फिरायला येणाऱ्यांसाठी जॉगिंग पार्क उभारत आहात ? असा सवाल उपस्थित केला होता. याचबरोबर सरकारने आंबेडकरी जनतेची घोर फसवणुक केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. इतकेच नव्हे तर इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याबाबत सरकार टाळाटाळ करीत आहे, असे म्हणत याच्या निषेधार्थ ६ डिसेंबरला आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला होता.
इतकेच नव्हे तर स्मारक करायची प्रामाणिक इच्छा सरकारमधे दिसत नाही. मुळ स्मारकाच्या संकल्पनेत डॉ. आंबेडकरांचा पुतळा ३९५ फुटी असावा. घटनेच्या कलमांच्या संख्येइतकी पुतळ्याची उंची असावी. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी उभारावा, अशी मागणी होती. सरकारने स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची संकल्पना चोरून ६०० फुटी स्टेच्यू ऑफ युनिटी उभारला, असा आरोपही आनंदराज आंबेडकर यांनी केला. सरकारचा पैसा न घेता आंबेडकरी जनता आपल्या पैशातून भव्य स्मारक उभारेल. आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो, असेही त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे आंबेडकरी विचाराचे सरकार सत्तेत येईल, त्यावेळी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना साजेशे स्मारक उभे करेल,असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर तुम्हाला जमत नसेल तर जनतेच्या पैशातून स्मारक करू नका. असा टोलाही आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला लगावला होता.तसेच या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्याची भेट घेऊ असेही त्यांनी म्हंटले होते.
मात्र काल ( ६ डिसेंबर ) रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता. त्यांच्या झालेल्या चर्चेनंतर आनंदराज आंबेडकर यांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे स्मारकाबाबत काही संघटनांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे काही संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. स्मारकाच्या संकल्पचित्राच्या आराखड्यात बदल करू शकतो. त्यामुळे आंदोलन करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी आंदोलन स्थगित केल्याचे समजते.
रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकी दरम्यान पोलिस आयुक्त देवेन भारती देखील उपस्थित होते.
काही संघटनांमध्ये मात्र स्मारकाबाबत नाराजी आहे. त्यामुळे काही संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. स्मारकाच्या संकल्पचित्राच्या आराखड्यात बदल करू शकतो. त्यामुळे आंदोलन करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानुसार आंबेडकर यांनी आंदोलन स्थगित केले. या वेळी पोलिस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.