औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील आगामी निवडणुका व पक्षाची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी राष्ट्रीय बहुजन क्रांती सेनेच्या वतीने मराठवाडास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात बैठक होत आहे.
या बैठकीमध्ये शेतकरी, कामगार, दुष्काळ आदी परिस्थितीवर विचारविनिमय करून आंदोलनाची भूमिका आखण्यात येणार आहे. तरी या बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय बहुजन क्रांती सेनेचे अध्यक्ष देवेंद्र खरात, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दिनेश जमधडे, मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुनील जाधव, के. टी. पाटील,
अशोक भालेराव, राजू पाटील, के. एच. लोमटे, हरिभाऊ पाईकराव यांनी केले आहे.