नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सीन, कोव्हीशिल्डसोबत लवकरच आणखी एका ‘अँटिबॉडी कॉकटेल’ची भर पडणार आहे. अहमदाबाद येथील झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या कोरोनावरील अँटिबॉजी कॉकटेल औषधाच्या चाचणीला परवानगी दिली आहे. कंपनीने ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे चाचणीसाठी नुकतीच परवानगी मागीतली होती.
झायडस कॅडिला भारतीय कंपनी
महत्त्वाची बाब म्हणजे झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही एकमेव भारतीय कंपनी आहे.
या कंपनीनं कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीवर आधारित कॉकटेल अँटीबॉडी विकसीत केली आहे.
ही लस सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी ठरणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, मोनोक्लोनल अँटिबॉडी हे एक असं रसायन आहे की जे नैसर्गिक अँटिबॉडी कॉपी करते.
जे शरीरातील संक्रमणाविरोधात लढण्यासाठी तयार होतं.
प्रभावी औषध शोधणं गरजेचं
झायडस हेल्थकेअर लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी सांगितले, कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्या सुरक्षित आणि जास्त प्रभावशाली औषध शोधण्याची जास्त गरज आहे.
या काळात कोरोनाचा त्रास कमी होऊ शकले अशा पर्यांयांची चाचपणी होणं अतिशय गरजेचं आहे.
कृपया हे देखील वाचा:
पुण्यातील ससून रूग्णालयामध्ये म्युकोरमायकॉसिसच्या 100 शस्त्रक्रिया
आता एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल WhatsApp, कंपनीकडून Multi Device Support ची घोषणा
‘ताकतच पहायची असेल तर…’ राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट
‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)