बहुजननामा ऑनलाइन – शिरुर तालुक्याच्या करंदी(youth beaten) येथील शिव रस्त्याला निधी मंजूर झाला मात्र रस्त्याच्या हद्द निश्चितवरून वाद झाला आणि त्यातून एका युवकाला(youth beaten) रस्त्याच्या कामात पुढाकार घेतो या कारणावरून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला असून यात युवकाचा दात पडला व नाकाचे हाड तुटले आहे .याबाबत श्रीकांत शिवाजी पऱ्हाड (वय ३६) रा. केंदुर (पऱ्हाडवाडी) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये गोरक्ष शामराव आगसकांडे, आबासाहेब शंकर आगसकांडे, जितेंद्र शामराव आगसकांडे, हनुमंत शामराव आगसकांडे सर्व राहणार करंदी (ता. शिरूर) यांच्या विरुद्ध
फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पऱ्हाड यांची शेतजमीन करंदी हद्दीमध्ये आहे आणि शेतजमीन मध्ये जाण्यासाठी पूर्वीपासून साखळी रस्ता वापरात आहे, त्या रस्त्याला शासनाचा निधी मंजूर झाला आहे परंतु करंदीतील काही नागरिकांची त्या रस्त्याला हरकत होती मोजणी झाल्यानंतरच रस्त्याचे काम करण्याची त्यांनी विनंती केली होती. दरम्यान मोजणी केल्यानंतरही मोजणी अमान्य केल्याने स्वतः तहसीलदार एल डी शेख यांनी पाहणी केल्यानंतर पऱ्हाड यांना देखील मोजणी करण्यास सांगितले होते यानंतर गोरक्ष आगसकांडे व आबासाहेब शंकर आगसकांडे यांनी सदरचा रस्ता खोदला याची विचारणा फिर्यादी श्रीकांत पऱ्हाड यांनी केल्याने गोरक्ष आगसकांडे आणि आबासाहेब शंकर आगसकांडे यांनी शिविगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शनिवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी यांचे वडील शिवाजी पऱ्हाड व कामगार राम कांडके यांना आरोपींनी मारहाण केली त्यानंतर आरोपी रस्त्यावर दगडी टाकत असल्याने फिर्यादीने दगडी का टाकता ? म्हणून विचारपूस केल्याने तू काय रस्त्याच्या कामाचा पुढारी झाला का? कसा रस्ता करतो तेच आम्ही बघतो असे म्हणत गोरक्ष आगसकांडे याने हातातील लोखंडी गज फिर्यादीच्या तोंडावर मारला त्यामुळे फिर्यादीचा दात पडला, आबासाहेब शंकर आगसकांडे याने फिर्यादीच्या दिशेने दगड फेकून मारल्याने फिर्यादीच्या नाकाला इजा झाली, जितेंद्र शामराव आगसकांडे व हनुमंत शामराव आगसकांडे यांनी फिर्यादीला धरून ठेवले व शंकर आगसकांडे व गोरक्ष आगसकांडे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून तुला खल्लास करून टाकतो अशी धमकी दिली.
दरम्यान गोरक्ष शामराव आगसकांडे, आबासाहेब शंकर आगसकांडे, जितेंद्र शामराव आगसकांडे, हनुमंत शामराव आगसकांडे सर्व राहणार करंदी (ता. शिरूर) यांच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी तीन आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करत आहेत.