टोरँटो : वृत्तसंस्था- इटलीच्या टोरँटोमध्ये 78 रुपयात म्हणजे 1 यूरोमध्ये घर खरेदी करता येऊ शकते. लिटील इटली म्हणून प्रसिद्ध असलेले टोरँटो शहर हे देशातील पहिले शहर आहे जेथे अशी आगळीवेगळी योजना सुरू केली आहे. परिसराची लोकसंख्या वाढावी हा या योजनेचा उद्देश आहे. सुरूवातीला लोकांना 5 हजार घरे विकली जातील, असे अधिकार्यांनी सांगितले. 19व्या शतकात इटलीचे बंदर असलेल्या या शहराची लोकसंख्या 40 हजार होती. परंतु, आता ही लोकसंख्या केवळ तीन हजारच झाली आहे. या ऐतिहासिक शहराची लोकसंख्या वाढविण्यासाठी अधिकार्यांनी हा मार्ग निवडला आहे.
अशी 25 हजार घरे निवडण्यात आली आहेत जी कमी दरात विकली जाऊ शकतात. यातील पाच हजार घरे ताबडतोब विकली जाणार आहेत. यापूर्वी 2011 मध्ये सिसलीची राजधानी पलेर्मो येथील गांगी शहरात 78 रुपये म्हणजे 1 यूरोमध्ये घर विकण्याची योजना सुरू झाली. यानंतर सुमारे 150 घरे विकण्यात आली. ही घरे लोकांनी खरेदी केल्यानंतर आता परिसरात पुन्हा गजबजाट सुरू होत आहे आणि लोकसंख्याही वाढली आहे.
2024 पर्यंत पर्यावरण अनुकूल होईल प्लांट
2019 मध्ये सिसलीच्या बीवोना, साम्बुका आणि मुसोमेलीमध्ये सुद्धा अशी ऑफर देण्यात आली. इटलीच्या उत्तर पश्चिममध्ये लोकेनासुद्धा अशाच ठिकाणांपैकी आहे जिथे लोकांना घर घेण्यासाठी सुमारे 7 लाख म्हणजे 9,000 यूरो मोजावे लागणार होते. मीडिया रिपोर्टनुसार, अधिकारी फांसेस्का विग्गिएनो यांनी सांगितले की, 78 रुपयांमध्ये घर विकण्याच्या बातमीवर लोकांनी प्रतिसाद दिला आहे. रोम, मिलान, न्यूयॉर्क सारख्या शहरातून लोक माहिती घेत आहेत. त्यांनी सांगितले की, एका स्टील प्लांटमुळे प्रदुषण होत असून लोक त्रस्त झाले आहेत. अधिकार्यांची योजना आहे की, 2024 पर्यंत प्लांट पर्यावरण अनुकूल व्हावा.