बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने हस्तक्षेप केल्यानंतर तपास वेगाने सुरू झाला आहे. सीबीाआयने घटनास्थळी केलेल्या सीन रिक्रेएशनमधून काही महत्त्वाच्या गोष्टी उलगडल्या आहेत. सुशांतच्या खोलीत इतर कोणत्याही मार्गातून आतमध्ये येऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुशांतने ज्या खोलीमध्ये आत्महत्या केली होती त्या खोलीची उंची 12 फूट आहे, सुशा्ंतची उंची 5.9 फूट होती तर त्याच्या पलंगाची उंची 4 फूट. सीबीआयच्या मते हे रिक्रिएशन केल्यानंतर प्राथमिक निरिक्षणात हे प्रकरणा आत्महत्या वाटत आहे. असे नाही वाटत आहे की कुणी सुशांतला मारून त्याला लटकवले असेल. मात्र सीबीआय प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहे. सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या खोलीाचा दरवाजा आतून बंद होता. त्याच्या खोलीमध्ये कुणीही कोणत्याही मार्गाने आतमध्ये जाऊ शकत नाही. खिडकीतून देखील कुणी येऊ शकत नाही. सीबीआयने या घटनेतील सर्व सीन रिक्रिएट करून पाहिले आहेत.
सीबीआयकडून वांद्रे येथे ते घटना रिक्रिएट करत पुराव्यांशी तपासून पाहण्यात आली. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याने आत्महत्या केली नसल्याचा दावा केला होता. यामध्ये त्याची उंची आणि घराच्या उंचीशी ताळमेळ नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बेडपासून फॅनपर्यंतची उंची सुशांतच्या उंचीच्या जवळपास असल्याने तो आत्महत्या करू शकत नसल्याचा अनेकांचा दावा आहे.