नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची माजी ऑलिम्पिकपटू अंजू बॉबी जॉर्जने ( Anju Bobby George) एक धक्कादायक माहिती दिली आहे. एका किडनीवर तिने भारतासाठी देदीप्यमान कामगिरी केली. तिच्या या माहितीनंतर सर्वांकडून तिचे कौतुक होत आहे. एका मूत्रपिंडाद्वारे आपण 2003 च्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावून अन्य स्पर्धामध्येही यश संपादन केल्याचा गौप्यस्फोट ऑलिम्पियन लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने केला आहे.
Believe it or not, I'm one of the fortunate, among very few who reached the world top with a single KIDNEY, allergic with even a painkiller, with a dead takeoff leg.. Many limitations. still made it. Can we call, magic of a coach or his talent @KirenRijiju @afiindia @Media_SAI pic.twitter.com/2kbXoH61BX
— Anju Bobby George (@anjubobbygeorg1) December 7, 2020
अंजूने 2003 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आतापर्यंत जागतिक स्पर्धेत एकाही भारतीय खेळाडूला ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये पदक जिंकता आले नाही, अंजू ही एकमेव खेळाडू आहे. 2000 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. तेव्हा मला हे कळाले. मी कशीबशी चालू शकत होते. हळूहळू मी सरावाला सुरुवात केली, परंतु माझे शरीर साथ देत नव्हते. तरीही मी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कमबॅक केले. अडथळ्यांवर मात करत, वेदनाशामक गोळ्या घेऊन मी हे यश मिळवले. जागतिक स्पर्धेत एका मूत्रपिंडाद्वारे भाग घेणारी कदाचित मी पहिली खेळाडू असेन, माझी गुणवत्ता किंवा प्रशिक्षकांची जादू असे या यशाचे वर्णन करता येईल, असेही ती म्हणाली. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, अंजूने आपली जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर देशाचे नाव उंचावले आहे.
अंजू बॉबी जॉर्जची कामगिरी
2003 ( पॅरीस) जागतिक अजिंक्यपद स्पर्धा – कांस्यपदक
2005 ( माँटे कार्लो) जागतिक अॅथलेटिक्स फायनल – सुवर्णपदक
2002 ( मँचेस्टर) राष्ट्रकुल स्पर्धा – कांस्यपदक
2002( बुसान) आशियाई स्पर्धा – सुवर्णपदक
2006 ( दोहा) आशियाई स्पर्धा – रौप्यपदक
2005 ( इंचॉन) आशियाई अजिंक्यपद – सुवर्णपदक
2007 ( अम्मान) आशियाई अजिंक्यपद – रौप्यपदक
2007 ( कोलंबो) दक्षिण आशियाई स्पर्धा – सुवर्णपदक