बहुजननामा ऑनलाइन – बदलत्या जीवनशैलीनुसार आपण किरकोळ वाटणाऱ्या आजाराकडे दुर्लक्ष करत असतो. पण या आजारांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. कारण हेच आजार काही दिवसानंतर त्रासदायक ठरु शकतात.(World Heart Day) विशेष म्हणजे बऱ्याच वेळा आपण छातीत दुखायला लागलं की त्याकडे दुर्लक्ष करत असतो. जास्त धावपळ केल्याने अथवा पोटात गॅस झाल्याने दुखत असेल असे म्हणून आपण टाळतो. मात्र, हा छातीत दुखण्याचा प्रकार हार्ट अटॅक सुद्धा असू शकतो असे म्हटले तर कोणाला खरं वाटणार नाही. तर आज आपण (World Heart Day) च्या निमित्ताने हृदयविकाराची कारणे, प्रकार जाणून घेणार आहोत.
हृदयविकाराची प्रमुख कारणे –
>> पौष्टिक आहाराची कमतरता
>> अयोग्य जीवनशैली
>> हृदयाला होणारा रक्तपुरवठा योग्य रीतीने न झाल्यास हा आजार उद्भवू शकतो.
>> लठ्ठपणा
>> धूम्रपान व मद्यपानाची सवय
१. कोरोनरी आर्टरी डिसीज
या आजारात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्त पुरवठा करतात, त्यांच्या कडांवर प्लेक (फॅटी पदार्थ) जमा होतात. त्यामुळे हृदयास रक्त पुरवठा सुरळीत होत नाही. या स्थितीस कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जाते. यामध्ये छातीत दुखणे, धाप लागणे, मळमळ होणे, अचानक चक्कर येणे आणि घाम अशी लक्षणे दिसू शकतात.
२.हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी –
हा आजार अनुवांशिक असून हृदयाच्या स्नायूंशी संबंधित आहे. यामध्ये थकवा, चक्कर येणे, छातीत दुखणे, श्वास घेताना त्रास होणे आणि पायावर सूज येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतील.
३. जन्मजात मुलांमध्ये भूक न लागणे, वजन न वाढणे, अंग निळसर पडणे, श्वास घेताना अडचण अशा प्रकारे हृदयासंबधी लक्षणे दिसतील.
४. हृदयापर्यंत कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाला तर हृदयविकार होऊ शकतो. त्यात हृदयात जळजळ होणे ही समस्या निर्माण होते.