पुणे : बहुजननामा ऑनलाइन– World Health Day | भाजपा महिला मोर्चा (BJP Mahila Morcha) आणि बेनकेअर हॉस्पिटल (Benecare Hospital) यांच्या वतीने आज (शनिवारी) जागतिक आरोग्य दिवस (World Health Day) साजरा करण्यात आला. त्यावेळी महिलांसाठी निरोगी स्वयंपाक म्हणजेच ‘Healthy Cooking’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. ‘महिलांना एकत्र आणून त्यांनी केलेले पदार्थ प्रस्तुत करण्याची एक छान संधी मिळवून देता यावी. यासाठी हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असल्याचे,’ भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा अस्मिता करंदीकर (Asmita Karandikar) यांनी सांगितलं आहे. (World Health Day)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त (World Health Day) आज भाजपा महिला मोर्चा आणि बेनेकेअर हॉस्पिटल यांच्या वतीने महिलांसाठी एक अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमावेळी नगरसेविका अर्चना तुषार पाटील (Archana Tushar Patil) यांनी महिलांना तब्बेतीची काळजी घेण्याचा आग्रह केला. तर, नगरसेविका स्वप्नाली सायकर (Swapnali Saykar) यांनी आरोग्याचे महत्व आपण लक्षात ठेवायला पाहिजे असे सांगितले. तसेच प्रभाग अध्यक्षा उमाताई (Umatai) यांनी उपस्थित सर्व महिलांचे कौतुक केले. त्यावेळी डॉ अलका परवते (Dr. Alka Parvate) यांनी पौष्टिक आहाराबद्दल माहिती सांगितली. (World Health Day)
या कार्यक्रम स्पर्धेत सुनिता लंबू (Sunita Lambu), पल्लवी करंबेळकर (Pallavi Karambelkar) आणि सोनाली शाह (Sonali Shah) ह्या विजेता ठरल्या आहेत. या विजेता महिलांचं अभिनंदन करण्यात आलं. त्यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) याच्या़ंतर्फे विजेत्यांना बक्षिसे आणि बेनेकेअर हॉस्पिटलकडून सुबक ट्रॉफी देण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही बापट (Vaidehi Bapat) तर आभार स्मरणिका जुवेकर (Smarinika Juvekar) यांनी केले. यावेळी गायत्री भागवत (Gayatri Bhagwat), डॉ राजेश देशपांडे (Dr. Rajesh Deshpande),
डॉ. जयदीप पलवडे (Dr. Jaideep Palwade), डॉ चारुशीला पलवडे (Dr. Charushila Palwade),
महिला मोर्चा पदाधिकारी स्नेहल चौगुले (Snehal Chowgule), राखी श्रीवास्तव (Rakhi Srivastava),
मीरा ओक (Mira Oak), शुभांगी इंगवले (Shubhangi Ingwale) आदी महिलांचा सहभाग होता.
Web Title :- World Health Day | BJP Mahila Morcha and Bankare Hospital celebrate ‘World Health Day’ with enthusiasm
हे देखील वाचा :
MSEDCL | …म्हणून सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद
Muslim Satyashodhak Mandal | मुस्लिम सत्यशोधक मंडळ ! समविचारी संघटनांच्या वतीने रविवारी आदरांजली सभा