बहुजननामा ऑनलाइन : करोनावरील प्रभावी लस जेंव्हा बाजारपेठेत उपलब्ध होईल, त्यावेळी ती प्रत्येक व्यक्तीला मोफत उपलब्ध करून ( Coronavirus vaccine should be given to everyone free of cost) द्यावी, यासाठी कोणाकडूनही पैस घेऊ नयेत, त्यासाठी लस बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना संयुक्त राष्ट्रांकडून निधी मिळायला हवा (Funding from the United Nations) अशी भूमिका इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती ( co-founder of Infosys, Narayana Murthy) यांनी मांडली आहे.
नारायण मूर्ती म्हणाले की, भारतातील सर्व जनतेला लस देण्यासाठी सरकारला सुमारे तीन अब्ज डोस तयार करावे लागणार आहेत. करोनाच्या दररोजच्या आकडेवारीत आज पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 38, 617 नवे रुग्ण समोर आल्याने एकूण बाधितांची संख्या 89 लाखांच्यावर गेली आहे. मंगळवारी 29, 164 प्रकरणांची नोंद झाली आहे. बाधीत झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ती आता 83 लाख एवढी झाली आहे.
दरम्यान कायम स्वरुपी घरुनच काम करण्याच्या अर्थात ‘वर्क फ्रॉम होम’च्या सुविधेवर नारायण मूर्ती यांनी असहमती दर्शवली. भारतात बहुतेक लोकांची घरं छोटी आहेत. ज्यामुळे घरून काम करताना त्यांना कामावर लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येते. तसेच थोड्या-थोड्या कालावधीसाठी शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. यासाठी पीपीई कीट, फिजिकल डिस्टंसिंग, मास्क आणि ग्वोव्ह्ज आदीसह अन्य सुरक्षा नियमांचे पालन काटेकोर होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.