बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांची एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या भयावह संकटामुळे लोक अधिक त्रस्त झाले आहेत. कोरोनामुळे टाळेबंदी लागल्याने अनेक ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना आता घरूनच काम (Work Form Home) करण्यास सांगितलं आहे.
परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसप्रमाणे घरी खुर्ची, टेबल अशा अनेक आरामदायी सुविधा नसल्याने त्या व्यक्तीला अनेक त्रासाला सामोरे जावे लागते.
टाळेबंदीमुळे लोकांना जादा तास वर्क फॉर्म होम करावं लागत आहे. आरामदायी खुर्ची, टेबलचा अभाव असल्याने मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी तसंच कमरेचा त्रास लोकांना होत आहे. बराचवेळ एकाच स्थितीत खुर्चीवर बसल्यानं अवयवांवर ताण पडतो. घरून काम केल्यामुळे, आपल्याला बर्याच तासांकरिता काम करावे लागते. अशावेळी हाडांच्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो. यावरून काही सोप्या आणि सरळ टिप्स प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुजूता दिवेकर यांनी व्हिडीओद्वारे शरीराच्या स्नायूंना आराम देण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. जाणून घ्या.
शरीराच्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी टिप्स –
– जर आपण घराबाहेर काम करत असाल आणि काही तास सिस्टमवर बसावे लागत असेल तर काहीवेळ तुम्ही स्वतःला विश्रांती द्यायला हवी.
– वारंवार कंम्प्यूटरकडे पाहून थकला असाल तर थोडा ब्रेक घ्या. आपली खुर्ची विरुद्ध बाजूनं वळवून डोळ्यांना आराम द्या.
– तुम्ही काम करण्यासाठी लॅपटॉपचा वापर करत असाल तर दुसरा माऊस आणि किबोर्ड कनेक्ट करून याचा उपयोग करा. यामुळे हात, मानेवर ताण येत नाही.
– बसताना नेहमी बॉडी पोश्चरकडे लक्ष द्या. बसताना कंबर, पाठ , मान सरळ एका रेषेत असावेत.
– लॅपटॉपमधून बाहेर येणारा प्रकार तुमच्या डोळ्यांसाठी घातक ठरतो. अशा स्थितीत खोलीत अधिकाधिक उजेड असावा.
– तुम्ही लॅपटॉपवर स्क्रिनवर गार्ड नक्कीच लावू शकता. त्यामुळे तुमचे डोळे चांगले राहण्यास मदत होईल.
– आपली पाठ, मान, हात आणि पाय योग्य मार्गाने स्ट्रेच करा. यामुळे तुमच्या शरीरात वेदना होणार नाहीत आणि स्नायूंचा ताणही कमी होईल.
– जर तुम्ही पूर्ण दिवस काम करत असाल तर व्यायाम, आराम करणंही महत्वाचं आहे.
– एक-दोन तास काम केल्यानंतर तुम्ही १० मिनिटं व्यायाम करत जागेवरून उठून चालण्याचा प्रयत्न करा. याने डोळ्यांना आराम मिळतो.
– जेव्हाही तुम्ही फोनवर बोलत असाल तेव्हा स्क्रिनवरून नजर बाजूला फिरवा, वेळ मिळाल्यास अधेमधे डोळ्यांना थंड पाण्यानं धुवा.