नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे (वय 44) यांचे गुरुवारी (दि. 20) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. विशेष म्हणजे पहाटेच्या सुमारास त्यांचे वडिल मनोहर गोऱ्हे यांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनापाठोपाठ अवघ्या काही तासाच्या अंतराने मुलीचेही निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मोनाली यांनी माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवली होती. त्यानंतर त्यांनी एक्सेल शुटींग नावाने नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक वर्षापासून मोनाली या नाशिक येथील युवा खेळाडूंना प्रशिक्षण देत होत्या. आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक म्हणून देखील त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या पश्चात आई आणि एक विवाहित बहिण आहे.