बहुजननामा ऑनलाईन टीम – आठ वर्ष रिलेशनशिपमध्ये असूनही लग्न न केल्याबद्दल एका मुलीने आपल्या प्रियकरावर दावा दाखल केला आहे. मुलाने आपला वेळ वाया घालवला असा या तरूणीचा आरोप आहे. 26 वर्षीय तरूणीने सांगितले की, मुलगा कधीही गंभीर नसतो, म्हणून तिला खटला दाखल करावा लागला. या महिलेचे म्हणणे आहे की तिचे भविष्य काय आहे हे जाणून घेण्याचा तिला अधिकार आहे. जेरटूड नगमा असे या 26 वर्षांच्या मुलीचे नाव असून हे प्रकरण आफ्रिकन देश झांबियाशी संबंधित आहे. प्रियकर हर्बर्ट सलालीकी 28 वर्षांचा आहे.
नागमा सांगते की, तिचे प्रियकराकडून तिला एक मूल देखील आहे आणि प्रियकराने तिच्याशी लग्न करण्याचे वचन देखील दिले. प्रियकर म्हणतो की, आर्थिक कारणास्तव तो लग्नासाठी तयार नाही. पण, नगमा म्हणाली की, स्थानिक प्रथेनुसार प्रियकराने यापूर्वीच आपल्या कुटूंबाला हुंडा रक्कम दिली आहे. लग्नाच्या प्रतीक्षेत ती थकली असल्याचे या महिलेने कोर्टाला सांगितले. या महिलेने सांगितले की आता ती तिच्या प्रियकराच्या निष्ठेवर शंका घेत आहे. सलालीकीचे दुसर्या एका महिलेशी अफेयर असल्याचे समजते.