मुरादाबाद : वृत्तसंस्था –मुरादाबादमधील संभल येथून ब्लॅकमेलिंगचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. यात एका महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका युवकाला आपल्या जाळ्यात ओढले आणि अनेक दिवस बांधून ठेवले. इतकेच नाही तर त्याचा अश्लील व्हिडीओ बनवून नातेवाईकांना ब्लॅकमेल करत 15 लाखांची खंडणीही मागितली. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला दंड ठोठावत अटक केली आणि महिलेच्या तावडीतून त्या तरूणाला वाचवले.
ब्लॅकमेलचे हे प्रकरण नखासा ठाण्यातील आहे. इथे राहणाऱ्या एका महिलेने जनपद शाहजहांपूरच्या एका युवकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही कारणाने त्याला घरी बोलावले. यानंतर महिलेने युवकासोबत अश्लील व्हिडीओ बनवला आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला अनेक दिवस बांधून घरात ठेवले.
15 लाखांची खंडणी मागितली
युवकाला बांधून ठेवल्यानंतर महिलेने साथीदारांच्या मदतीने युवकाच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत 15 लाखांची खंडणीही मागितली. इतकेच नाही तर खंडणी दिली नाही तर युवकाला जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांची कारवाई
ब्लॅकमेलर्सला वैतागून युवकाच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सोडवत 6 आरोपींना ताब्यात घेतलं. बांधलेल्या युवकाची सुटकाही केली. याबाबत बोलताना अप्पर पोलीस अधिक्षक आलोक कुमार म्हणाले, “अटक केलेल्या आरोपींना दंड ठोठावत त्यांना तुरुगांत पाठवण्यात आलं आहे. पुढील कारवाई केली जात आहे. सदर आरोपी महिला ही मूळची शाहजहांपूरची रहिवासी आहे.”