बहुजननामा ऑनलाईन – लवकरच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आली आहे. या चर्चेला सुरुवात ही धोनीच्या मित्राने पोस्ट केलेल्या एका फोटो पासून झाली. त्याच्या मित्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये धोनी राजकारण्यांच्या रूपात दिसून येत असून या चर्चेला सुरुवात झाली. अलीकडे देखील धोनी राजकारणात जाणार असल्याच्या चर्चाना जोर आला होता.
नुकताच धोनी भारतीय लष्कराची सेवा बजावून घरी आला आहे. यादरम्यानच त्याचा हा फोटो व्हायरल झाल्याने त्याच्या चाहत्यांना याबाबत शंका वाटत आहे. हा फोटो सोशल मीडियावर धोनीचा बालपणीचा मित्र आणि व्यवस्थापक मिहीर दिवाकरने व्हायरल केले आहे. याआधीही भाजपचे नेते संजय पासवान यांनी धोनी हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. यानंतर धोनीची भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली होती. यावेळी देखील पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र यावेळी धोनीनी आपले पत्ते उघडले नव्हते.
जम्मू- काश्मीरच्या खोऱ्यात भारतीय लष्कराची सेवा बजावून धोनी नुकताच घरी परतला आहे. धोनी सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तर धोनीने वर्ल्डकपनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेतली असून आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो खेळतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.