नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील टॅक्सी चालक फर्स्ट एड बॉक्समध्ये चक्क कंडोम ठेवतात अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरातील असे अनेक टॅक्सी चालक आहेत जे असे करतात. फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम नसेल तर वाहतूक पोलीस चलान कापतात असतात त्यांचं म्हणणं आहे. याबाबत काही टॅक्सी चालकांनी तसा उल्लेखही केला आहे.
‘एड बॉक्समध्ये कंडोम नसल्याने मला दंड ठोठावला’
धर्मेंद्र नावाचा एक टॅक्सी चालक म्हणाला, “पोलिसांनी माझ्या एड बॉक्समध्ये कंडोम नसल्याने मला दंड ठोठावला.” पावतीवर जरी गाडी वेगाने चालवल्याचे नमूद केले असले तरीही आपण हळूच गाडी चालवत होतो परंतु कंडोम नसल्यानेच चलान कापल्याचं धर्मेंद्र सांगतो. धर्मेंद्र प्रमाणेच इतर अनेक टॅक्सी चालक आहेत जे आपल्या ए़ड बॉक्समध्ये कंडोम ठेवतात.
म्हणून ठेवला जातो एड बॉक्समध्ये कंडोम
दिल्लीतील ओला, उबर, टॅक्सी चालकांच्या सर्वोदय चालक संघटनेचे अध्यक्ष कमलजीत गिल यांनी याबाबत माहिती दिली आहे. एड बॉक्समध्ये कायम 3 कंडोम ठेवण्याचा नियम आहे अंस गिल सांगतात. एखाद्याला रस्त्यावर अचानक रक्तस्राव सुरू झाला किंवा त्याचे हाड तुटले तर कंडोम वापरून त्याच्यावर प्रथमोपचार करणे शक्य आहे. जखम झालेल्या भागावर कंडोम बांधून ठेवता येतो. आपत्कालीन परिस्थितीत काही द्रव्य वाहून नेण्यासाठीही त्याचा वापर होतो. कारण त्यात 3 लिटर द्रव्य राहू शकतं.” असं गिल यांनी इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
कंडोम ठेवण्यातबाबत वाहतूक कायद्यात कोणताही नियम नाही
काही टॅक्सीचालक केवळ अंधश्रद्धेपोटी टॅक्सीच्या फर्स्ट एडमध्ये कंडोम ठेवतात. कंडोम ठेवला नाही तर आपल्याला दंड केला जाऊ शकतो अशी त्यांची अंधश्रद्धा आहे. असे कोणत्या नियमात लिहिले आहे असे विचारले तर त्या चालकांकडे याचे उत्तरही नसते. इतकेच नाही तर आरोग्य चाचणीत कंडोमबद्दल विचारल्याचंही काही चालक म्हणतात. दुसरीकडे आरोग्य चाचणीमध्ये कोणत्याच चालकाला कंडोमसंदर्भात विचारले जात नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं. इतकेच नाही तर वाहतूक कायद्यात फर्स्ट एडमध्ये कंडोम ठेवण्याबाबत कोणताही उल्लेख नाही.
Visit : bahujannama.com