मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – देशभरात 60 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र, 78 वर्षाचा बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी अद्यापही लस घेतली नाही. अमिताभ यांनी अजूनही लस का घेतली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र अमिताभ यांनी आता स्वतःच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच एक ब्लॉग शेअर करत यांनी म्हटले होते की, की व्हायसरच्या आणखी एका प्रकाराची भीती वाटत आहे. लवकरच मलाही लस घ्यावी लागेल. जेव्हा माझे डोळे बरे होतील. तोपर्यंत जग वेगळच असल्याचे म्हटले होते. दरम्यान आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोनाची लस घेतली आहे. यात शर्मिला टागोर, धर्मेंद्र, जितेंद्र, परेश रावल, सतीश शाह, राकेश रोशन आणि जॉनी लिवर यासारखी अनेक नावं आहेत. दाक्षिणात्य कलाकारांमध्ये कमल हसन, नागार्जुन आणि मोहन लाल यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.
बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास अमिताभ बच्चन लवकरच इमरान हाश्मीसोबत चेहरे सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमात रिया चक्रवर्तीची देखील महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय ब्रह्मास्त्र सिनेमातही अमिताभ झळकणार आहेत. यात त्यांच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कलाकारही असणार आहेत.