• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिध्दू कोण अन् खरंच त्यानं भडकावलं ?, जाणून घ्या

by sajda
January 27, 2021
in ताज्या बातम्या
0
Deep Sidhu

Deep Sidhu


बहुजननामा ऑनलाइन टीम –     
शेतकरी संघटना २७ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत १० बैठका झाल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी हे दोन्ही पक्ष आपापल्या बाजूवर ठाम राहिले आहेत. या मुद्द्यावरून तिढा निर्माण झाला होता. मात्र, आता हा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा हिंसाचार झाला. यात दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली.

शेतकरी आंदोलन करणाऱ्या नेत्यांकडून हिंसक घटनांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.  त्यांनी हिंसा भडकावण्याचं काम केल्याचा काही जणांवर आरोप केला आहे. शेतकरी नेत्यांनी दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. दिप सिद्धू गेल्या नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय आहेत. त्यावर दिप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही”, असं दिप सिद्धू यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यानं फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावर दीप सिद्धू म्हणाले, “आंदोलनामुळे लोकांचा रोष वाढला आणि आंदोलकांना भडकवण्यासाठी कुठल्या एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आमचे शेतकरी प्रदर्शन करत आहेत आणि आज जे झालं ते त्याला वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जाऊ शकत नाही. ” दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू यांच्यावर आरोप केले आहेत. “दिपू सिद्धू आणि गँगस्टर ते नेता असा प्रवास केलेल्या लखा सिधाना यांनी काल रात्री सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भडकावण्याचं काम केलं”, असा थेट आरोप यादव यांनी केला आहे. यासोबतच एक मायक्रोफोन घेऊन दीप सिद्धू लाल किल्ल्यापर्यंत कसा पोहोचला याचीही चौकशी व्हायला हवी, असंही ते पुढे म्हणाले. योगेंद्र यादव यांच्यासोबच भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

दीप सिद्धू आहेत तरी  कोण ?

विशेष म्हणजे, २०१९ साली अभिनेते सनी देओल यांनी गुरुदासपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी देओल यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या टीममध्ये दीप सिद्धू यांनाही सामील केलं होतं. दरम्यान, लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या घटनेनंतर सनी देओल यांनी ट्विट करत “माझा किंवा माझ्या संपूर्ण कुटुंबाचा दीप  सिद्धू यांच्याशी कोणताही संबंध नाही”, असं स्पष्ट केलं आहे. दीप सिद्धू यांचा जन्म १९८४ साली पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात झाला. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. किंगफिशर मॉडल हंट हा पुरस्कार जिंकण्यापूर्वी ते बारचे सदस्य देखील होते. २०१५ मध्ये दिप सिद्धू यांचा पहिला पंजाबी सिनेमा- रमता जोगी प्रदर्शित झाला. तर २०१८ मधील सिनेमा ‘जोरा दास नम्ब्रिया’मुळे त्यांची लोकप्रियता वाढली. या सिनेमात त्यांनी गँगस्टरची भूमिका साकारली होती.

 दीप सिद्धू पोहोचले शेतकरी आंदोलनात

दरम्यान, अनेकांनी दीप  सिद्ध यांच्या सहभागाबद्दल आक्षेप घेतला होता. नरेंद्र मोदी आणि सनी देओल यांच्यासोबतचा दीप सिद्धू यांचा फोटो व्हायरल करत ते भाजपचे एजंट असल्याची टीका केली गेली होती. मात्र दीप सिद्धू यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. देशातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि सिनेक्षेत्रातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार २५ डिसेंबर रोजी अनेक कलाकार सिंघू सीमेवर पोहोचले होते. त्यातच दीप सिद्धू देखील होते. त्यांनी शेतकऱ्यांसोबतच धरण आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहनही सोशल मीडियातून केलं.

Tags: Deep SidhuFarmer'sprovokeआंदोलनआरोपदिप सिध्दू
Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय ! 15 वर्षे जुन्या गाड्या आता भंगारात जमा होणार

Next Post

Master OTT Release : थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता Amazon Prime वर रिलीज होणार ‘मास्टर’ ! जाणून घ्या तारीख

Next Post
Master OTT Release

Master OTT Release : थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता Amazon Prime वर रिलीज होणार 'मास्टर' ! जाणून घ्या तारीख

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वासोबत कधी तडजोड केली नाही, करणार नाही – राजनाथ सिंह

6 days ago

‘पतंजली’ची डोकेदुखी वाढली ! Twitter वर बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

5 days ago

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतून येणाऱ्यांना ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह दाखवणं बंधनकारक

4 days ago

नियमांचं उल्लंघन केल्यास उध्दव ठाकरे जवळच्या व्यक्तीला देखील सोडत नाहीत – संजय राऊत

4 days ago

माजी जिल्हा परिषद अध्यक्षासह नवनिर्वाचित सरपंच विरोधात गुन्हा दाखल; शिरूर तालुक्यातील घटना

2 days ago

बाबा रामदेव यांचा ‘कोरोनिल’बाबात दावा; WHO म्हणाले – ‘आम्ही असे कोणतेही औषध मंजूर केलेले नाही’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat