नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp चा वापर मेसेज पाठवण्यासाठी किंवा चॅटसाठी भारतात सर्वात जास्त केला जातो. काहीही बोलण्यासाठी ते महत्वाची माहिती शेयर करण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. अशावेळी जेव्हा कुणी यूजर आपला स्मार्टफोन (Smartphone) किंवा मोबाइल फोन नंबर बदलतो, तेव्हा नेहमी तो जुने चॅट किंवा कॉन्टॅक्ट नंबर गमावतो. हे टाळण्यासाठी काय करायचे ती प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेवूयात. (WhatsApp)
असे मिळवू शकता जुने चॅट
– सर्वप्रथम WhatsApp अॅपमध्ये ‘सेटिंग’मध्ये जा.
– यानंतर ‘अकाऊंट‘ उघडा, नंतर ‘नंबर बदला’ पर्यायाची निवड करून पुढील क्लिक करा.
– परंतु नेक्स्ट बटन दाबण्यापूर्वी जुना आणि नवीन नंबर नोंदवावा लागेल.
– आता कन्फर्मेशनसाठी स्क्रीनवर मेसेज दिसेल.
– आता सर्व संपर्क, माझ्याकडील संपर्क आणि कस्टमसारखे पर्याय निवडू शकता.
– अधिसूचनेवर क्लिक केल्यानंतर संपर्क माहिती अपडेट होईल.
– आता सबमिट बटनवर क्लिक करा.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यूजर्सला अॅप पुन्हा उघडावे लागेल आणि एक ओटीपी नोंदवावा लागेल. एकदा ओटीपी नोंदवल्यानंतर, चॅट जैसे थे राहील आणि तुमचा मोबाइल फोन नंबर प्रभावी प्रकारे बदलला सुद्धा जाईल. हे फीचर तेव्हाच काम करेल जेव्हा नवीन नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
Web Title :- WhatsApp | now how to change whatsapp number without losing old chats and contacts know step by step process.
Pune Crime | 24 वर्षीय तरूणीची 4 मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या, पुण्याच्या वाकड परिसरातील घटना