उत्तराखंड बहुजननामा : डेहेराडून शहरातील एका पोलीस स्टेशन ने बनविलेल्या व्हाट्स ऍप ग्रुप वर अश्लील विडिओ शेअर करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा विडिओ पाहताच महिला कर्मचार्यांनी एक- एक करून ग्रुप मधून बाहेर पडले आहेत. पोलीस स्टेशन मधील एका वरिष्ठ पोलिसकर्मच्याला जेव्हा हि बातमी लक्षात आली तेव्हा , त्यांनी सगळ्यांना ग्रुप सोडण्यास सांगितले. शुक्रवारी जेव्हा हि घटना सोशल मीडिया वर व्हायरल झाली, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सध्या ह्याच गोष्टीची चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , एका पोलिसकर्मचाऱ्याने हा व्हाट्स ऍप ग्रुप बनवला होता, जो महत्वपूर्ण घटनांच्या माहितीसाठी बनविण्यात आला होता. ह्या ग्रुप मध्ये स्टेशन च्या अंतर्गत इतर पोलीस चौक्यांचे कर्मचारी देखील होते. दोन दिवसांपूर्वी ह्या ग्रुप वर अश्लील विडिओ पाठवण्यात येत आहे, हा प्रकार पाहून पोलीस कर्मचारी अचंबित झाले आहेत.
हे पाहिल्यानंतर अनेक जण हा ग्रुप एक – एक करून सोडू लागले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेबद्दल विरोध दर्शविला आहे, वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याने लगेच सर्वाना ग्रुप सोडण्याचे आव्हाहन केले आणि आपल्या मोबाईल क्रमांकावरून नवीन ग्रुप सुरु करण्यास सांगितले. या घटनेबाबत लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.