व्हॉट्सअॅपवर नवीन फ्रॉड ब्रिटनमध्येसमोर आला आहे. हा सायबर स्कॅम एका व्हॉट्सअपॅप मेसेजने सुरू होतो. ज्यामध्ये यूजरला मेसेज पाठवून फसवले जाते. या स्कॅम (WhatsApp fraud) किंवा घोटाळ्यात सायबर गुन्हेगार यूजरला ‘हेलो मम’ किंवा ‘हॅलो डॅड’ लिहून पाठवतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यानंतर ताबडतोब एक एसओएस पाठवला जातो ज्यामध्ये म्हटले जाते तुमचा मुलगा किंवा मुलगी संकटात आहे आणि त्यास पैशांची तातडीने गरज आहे. ब्रिटनमध्ये काही महिन्यात लोकांच्या खात्यातून 50,000 पाऊंडपर्यंत काढण्यात आले आहेत.
कशी होते फसवणूक
या मेसेजने आई-वडील किंवा पालकांना वाटते की, त्यांच्या मुलाला पैशांची सक्त गरज आहे आणि ते सांगितलेल्या लिंकवर क्लिक करून पैसे पाठवतात. आई-वडील काहीही चौकशी न करता ताबडतोब पैसे पाठवतात.
मेसेजमध्ये हे सुद्धा लिहिलेले असते की, दुसर्या व्यक्तीच्या मोबाइलवरून मेसेज करत आहेत कारण माझा मोबाईल चोरीला गेला आहे. मेसेज (WhatsApp fraud) मध्ये लिहिलेले असते की, नवीन फोन खरेदी करण्यासाठी किंवा मोबाईल बिल भरण्यासाठी पैशांची सक्त गरज आहे. अशा मेसेजने आई-वडीलांना चिंता वाटते आणि ते ताबडतोब दिलेल्या बँक डिटेलवर पैसे पाठवतात. असे अनेक फ्रॉड ब्रिटनमध्ये उघडकीस आले आहेत.
Web Title :- Whatsapp Fraud | whatsapp fraud beware of new cyber scam text it could cost you thousands
Aadhaar Card | तुमच्या ‘आधार’ द्वारे किती Sim झाले अॅक्टिव्हेट, ‘या’ पध्दतीनं ऑनलाइन जाणून घ्या
Bigg Boss 15 | ‘बिग बाॅस 15’च्या सेटवर राखी सावंतच्या पतीने पहिल्यांदाच केलं तिला KISS
Monalisa | मोनालिसाच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, व्हायरल झाले फोटो