मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बंधू-भगिनींमध्ये सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करत पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पंकजांनी 40 मिनिटं भाषण केलं. त्यानंतर त्यांना चक्कर आली.पंकजांनी आपलं संपूर्ण भाषण केलं. तेव्हा त्यांना काही झालं नाही आणि शेवटी शेवटी अचानक चक्कर आली असा सवाल शरद पवार यांनी पंकजा मुंडे यांना केला आहे.
बहिणाबाई’ शब्दात यातना होण्यासारखं काय आहे ?
धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना शरद पवार म्हणाले की , ‘धनंजय मुंडे हे पंकजांना बहिणाबाई बोलल्याचं मी ऐकलंय. त्यात वावगं काहीच नाही. बहिणाबाई हा आदरणीय शब्द आहे. या शब्दात यातना होण्यासारखं येण्यासारखं काय आहे. उलट हा शब्द आदरणीय आहे. त्यात मला आक्षेप घेण्यासारखं किंवा गंभीर काहीच वाटत नाही.’
महिला आयोगाचा पक्षपातीपणा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लीप आधी महिला आयोगाने काळजीपूर्वक तपासून योग्य पाऊल उचलण्याची गरज होती, मात्र तसे झालेले दिसत नाही. पंकजा-धनंजय वादात राज्य महिला आयोगानं तत्परता दाखवत धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली.
Visit : bahujannama.com