बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रत्येकाला माहित आहे की धूम्रपान करणे चांगली गोष्ट नाही, मित्र व कुटुंबातील मोठे सदस्य नेहमी धूम्रपान करणार्यांना सांगत असतात की हे व्यसन सोडले पाहिजे. वैज्ञानिकदृष्ट्या चर्चा केली तर धूम्रपान करणे इतके वाईट आणि धोकादायक आहे की ते आपल्यापासून आपल्या त्वचेचा चमकदारपणा काढून घेऊ शकते. त्याच वेळी धूम्रपान केल्याने त्वचेवर किती वाईट परिणाम होतात. आज आपण धूम्रपान केल्याने त्वचेवर काय परिणाम होतात याबद्दल जाणून घेऊया.
त्वचा लटकणे, सैल होणे
संशोधनात असे आढळले आहे की तंबाखूच्या धुरामध्ये चार हजारांपेक्षा जास्त विषारी रसायने असतात. यापैकी बरेच रसायने कोलेजन (collagen) आणि इलेस्टिन (elastin) वर परिणाम करतात. हे फायबर्स आपल्या त्वचेला स्ट्रेंथ व लवचिकता प्रदान करतात. धूम्रपान करणाऱ्या, एवढेच नाही तर धुराच्या आसपास असणाऱ्या लोकांच्या त्वचेचे देखील यामुळे नुकसान होते. यामुळे त्वचेचे लटकणे आणि सैल होणे अशी लक्षणे दिसतात.
हात आणि ब्रेस्टची त्वचा सैल होऊन लटकणे
धूम्रपान केल्याने केवळ चेहऱ्याच्या त्वचेवरच परिणाम होत नाही तर शरीराच्या इतर भागावरही परिणाम होतो. हे इनर आर्म आणि ब्रेस्ट च्या त्वचेला सैल करते. यामुळे तेथील त्वचा लटकलेली दिसते. संशोधकांना असे आढळले आहे की धूम्रपान करणार्यांच्या ब्रेस्टची त्वचा लटकलेली दिसते, असे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये पाहायला मिळते.
सोरायसिसची उद्भवते समस्या
अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की धूम्रपान करण्याचा इतका गंभीर परिणाम त्वचेवर होतो की लोकांना सोरायसिस सारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो. सोरायसिस एक प्रकारची क्रॉनिक कंडीशन आहे ज्यामुळे त्वचेवर पातळ, खवले पॅच पडतात. अशा प्रकारचे पॅच विशेषत: गुडघे, कोपर, टाळू, हात, पाय आणि पाठीवर दिसतात. या पॅचेसचा रंग पांढरा, लाल आणि सिल्वर असू शकतो.
डोळ्यांखालील त्वचा सैल होणे
केस वेस्टर्न रिझर्व युनिव्हर्सिटीचे एमडी गुयुरॉन यांच्या म्हणण्यानुसार, एका संशोधनात असे दिसून आले आहे की दोन बहिणींपैकी एकीने 14 वर्ष धूम्रपान केले आणि दिवसाचे अर्धा पॅकेट सिगारेट ती ओढत होती. काही काळानंतर आढळले की जी धूम्रपान करत होती तिच्या डोळ्यांखालील त्वचा सैल झाली आणि ती वृद्ध दिसू लागली. यातून हे समजते की तंबाखू आपल्या शरीरासाठी किती घातक आहे. यामुळे शरीराच्या आत व शरीराच्या बाहेरही हानी होते.
डोळ्याजवळ सुरकुत्या
धूम्रपान करण्याचा त्वचेवर इतका धोकादायक परिणाम होतो की प्रत्येक धूम्रपान करणार्याच्या डोळ्याभोवती काही काळानंतर सुरकुत्या तयार होतात. या सुरकुत्या काळाच्या आधीच लोकांच्या चेहऱ्यावर तयार होतात. सिगरेटच्या धुरामुळे त्वचेवर हा परिणाम होतो. सिगारेटच्या केमिकल्समुळे त्वचा आतून खराब होण्यास सुरवात होते, त्याचबरोबर रक्तवाहिन्यांनाही नुकसान होते. ज्यामुळे डोळ्याभोवती सुरकुत्या दिसतात.
ओठांभोवती येतात लाईन्स
धूम्रपान केल्याने तोंडाच्या आसपासच्या त्वचेवर देखील परिणाम होतो. सिगरेटचा कश मारल्यामुळे ओठांभोवती रिंकल तयार होतात, जे धूम्रपान न करणार्यांमध्ये दिसत नाहीत. जे लोक धूम्रपान करतात त्यांची त्वचा सैल होते, ज्यामुळे ओठांच्या सभोवताली डीप लाईन्स तयार होतात. त्याच वेळी, जे धूम्रपान करतात त्यांचे ओठ सामान्य लोकांच्या ओठांपेक्षा काळे पडतात. एखादी व्यक्ती धूम्रपान करते की नाही हे त्यांचे ओठ पाहून कोणताही सामान्य माणूस ओळखू शकतो.
एज स्पॉट चे बनणे
धूम्रपान केल्यामुळे हात आणि चेहऱ्याच्या त्वचेवर एज स्पॉट विकसित होतात. एज स्पॉट असे असतात जे नैसर्गिकरित्या उद्भवतात, जेव्हा एखादा व्यक्ती वयस्कर होतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एज स्पॉट दिसू लागतात, परंतु जे धूम्रपान करतात त्यांच्या चेहऱ्यावर वेळेच्या आधीच एज स्पॉट दिसू लागतात.
स्किन टोन खराब होते
धूम्रपान करण्याचा त्वचेवर इतका वाईट परिणाम होतो की जे धूम्रपान करतात त्यांचा स्किन टोन खराब होतो. जे लोक बऱ्याच काळापासून धूम्रपान करत आले आहेत त्यांच्या त्वचेला ऑक्सिजन आणि पोषक घटक कमी मिळतात. तर काही धूम्रपान करणारे पिवळे दिसतात तर काहींमध्ये असामान्य रंग विकसित होतो. युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मिलर स्कूल ऑफ मेडिसिनच्या त्वचारोगतज्ज्ञ जॉनिटी केरीच्या म्हणण्यानुसार, जे धूम्रपान करतात त्यांच्या स्किन मध्ये बदल दिसून येतात.
तरुण लोकांना करते वृद्ध
धूम्रपान केल्यामुळे त्वचेवर इतका वाईट परिणाम होतो की लहान वयातच लोक वृद्ध दिसू लागतात. धूम्रपान करणार्यांचे दात, केस, त्वचा सामान्य किंवा त्यांच्या वयाच्या लोकांच्या तुलनेत जास्त वृद्ध दिसते. त्याच वेळी, धूम्रपान फर्टिलिटीला प्रभावित करण्यासोबतच हार्ट, लंग्स आणि हाडांना कमकुवत करते.
बोटांचा आणि नखांचा रंग बदलतो
बोटांमध्ये सिगारेट पकडून ओढणे आपल्याला एक चांगला अनुभव देत असेल, मात्र जास्त प्रमाणात धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या बोटांचा रंग आणि नखांचा रंग बदलू लागतो. परंतु हे देखील खरं आहे की जर कोणी धूम्रपान करणे थांबवते तर त्याच्या नखांचा आणि बोटांचा रंग परत येऊ लागतो.