वाशिम : बहुजननामा ऑनलाईन – बक्षिसपत्राद्वारे वडिलोपार्जित जमीन दुसऱ्याच्या नावावर करून देण्यासाठी तलाठ्याने रुपये तीस हजारांची लाच (Washim ACB Trap) मागितल्याचा प्रकार वाशिमधील वडगाव ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये (Washim ACB Trap) तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार ACBने सापळा कारवाई करत चालखोर तलाठ्यास ताब्यात घेतले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आजीच्या नावावर असलेली 5 एकर शेती बक्षीसपत्राद्वारे आजीच्या पणतूच्या नावावर करण्यासाठी बक्षीसपत्र करून त्याची फेरफारला नोंद करण्याकरिता तलाठी आशिष प्रदीप सावंगेकर (वय 32, रा. गणेश वार्ड, पुसद जि. यवतमाळ) यांनी दि.13 डिसेंबर 2022 रोजी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी तडजोडीअंती 41 हजार रुपये स्वीकारण्यास अनुमती दाखवली. तसेच प्रथम 30 हजार रुपये देऊन नंतर फेरफार नोंद झाल्यावर 11 हजार देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास (Washim ACB Trap) माहिती दिली.
विभागाने 14 डिसेंबर 2022 रोजी सापळा कारवाई करत 30 हजार रुपये लाच स्वीकारताना
तलाठी आशिष सावंगेकर यांना रंगेहात अटक केली. सावंगेकर यांना ACB च्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून,
त्यांच्याकडून लाच रक्कम जप्त करण्यात आली आहे.
त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत,
अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक गजानन आर शेळके,
पोलीस हवालदार नितिन टवलारकर, विनोद अवगळे, विनोद मारकंडे, दुर्गादास जाधव पोलीस नाईक रविंद्र घरत,
योगेश खोटे यांनी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :-Washim ACB Trap | While accepting a bribe of 30 thousand, Talathi was caught in the net of anti-corruption washim
हे देखील वाचा :
SSC HSC Exams | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांसाठी आता 50 ऐवजी 25 रुपये शुल्क