नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्होडाफोनने ४९९ रुपयांची नवीन प्रीपेड योजना बाजारात आणली असून या योजनेची वैधता ७० दिवस आहे. ४९९ रुपयांचा नवीन प्लॅन सुरू झाल्यामुळे कंपनीने सध्याच्या ५५५ रुपयांच्या प्रीपेड योजनेची वैधताही ७७ दिवसांपर्यंत वाढवली आहे.
व्होडाफोनच्या ५५५ रुपयांच्या योजनेत पहिले ७० दिवसांची वैधता देण्यात आली होती. पण आता ४९९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणे फायदे या प्लॅनमध्ये मिळत होते. नवीन प्रीपेड व्होडाफोन आणि आयडिया ग्राहकांसाठी बाजारात आणले आहे. व्होडाफोन वेबसाइटच्या यादीनुसार ४९९ रुपयांच्या योजनेत ग्राहकांना अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल आणि ७० दिवसांच्या वैधतेसोबत १.५ जीबीचा हाय स्पीड डेटा मिळणार आहे. सोबतच या योजनेत दररोज १०० लोकल आणि नॅशनल एसएमएस देखील दिले जातील.
अधिकृत यादीनुसार ४९९ रुपयांची प्रीपेड योजना सुरुवातीच्या काळात निवडक भागातच उपलब्ध करुन देण्यात आली होती. यात दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची नावे असून हा प्लॅन आयडिया नेटवर्क ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे.
४९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनप्रमाणे व्होडाफोनने ५५५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बदलला असून सध्या निवडक भागातच तो मर्यादित आहे. ५५५ रुपयांची बदललेला प्रीपेड प्लॅन आयडिया नेटवर्क ग्राहकांसाठीही उपलब्ध असेल.