नवी दिल्ली : वृत्तसंस्था- विश्व भारती विद्यापीठाने सातव्या वेतन आयोगानुसार प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 20 ऑक्टोंबर 2019 आहे. बंगालच्या विश्व भारती विद्यापीठातील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक अशा 133 पदासाठीची ही भरती वेगवेगळ्या विषयांसाठी असणार आहे. यात तुलनात्मक धर्म, दर्शन, इतिहास, प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व, पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन, बंगाली, चीनी आणि जपानी यांचा समावेश आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयात पीएच डीची डिग्री घेतलेली असणं आवश्यक आहे. अर्जदाराकडे कमीत कमी 10 रिसर्च पब्लिकेशन्सच्या सहकर्मी समीक्षा केल्याचा किंवा युजीसी सूचीबद्ध जर्नलमध्ये काम केल्याचा अनुभव असावा.
किमान 10 वर्ष अध्यापनाचा अनुभव आवश्यक
एखाद्या विद्यापीठ / महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / प्राध्यापक म्हणून किमान 10 वर्षांचा अध्यापन अनुभव असावा. डॉक्टरेट उमेदवाराला पुराव्यासोबत संशोधन केल्याचा अनुभव असावा. या भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवार विद्यापाठाची वेबसाईट visvabharati.ac.in वर जाऊ शकतात. प्राध्यापकासाठी उमेदवाराचे वय 45 आणि सहयोगी प्राध्यापकासाठी वय 40 वर्षे असणे गरजेचे आहे.
प्राध्यापक पदासाठी वेतन- सातवा वेतन आयोगानुसार, अॅकेडेमिक लेवल 14 सोबत एंट्री पे 1,44,200 रुपये.
सहयोगी प्राध्यापकाचे वेतन- सहयोगी प्राध्यापकासाठी अॅकेडेमिक लेवल 13A सोबत एंट्री पे 1,31,400 रुपये.