नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात अशी कोणतीही गोष्ट नाही, जी आपण अभ्यासाद्वारे करू शकत नाही. जगभरात योगाला संरक्षण ढाल मानले जाते, जे अनेक आजारापासून आपल्या शरीराचे रक्षण करते. आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत ज्यांनी नियमित योगासह मोठ्या आजारांना दूर पळविले आहे. त्यामुळे बहुतेकजण त्याचा अवलंब करत आहे. त्यात सोशल मीडियावर आश्चर्यकारक व्हिडिओ खूप लवकर व्हायरल होतात. असाच एका मुलीचा व्हिडिओ आजकाल चर्चेत आहे. जे पाहून आपण म्हणाल कि, या मुलीच्या शरीरात हाडं आहेत की नाही?
सोशल मीडियावर व्हायरल योग व्हिडिओ
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी नुकताच सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी अद्भुत योग करत आहे. तिची साधना पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. या मुलीचा योग व्हिडिओ पाहून, मोठे योग गुरुदेखील हैराण होतील. वास्तविक, या मुलीने योग साधनासह आपले शरीर इतके फ्लेक्सिबल केले आहे की ती हवे तसे ते वळवू शकते. यामुळे तिने सर्वांचे मन जिंकले आहे.
#योगाभ्यास से इस बच्ची ने अपने शरीर को इतना फ्लेक्सिबल बनाया है कि बहुतों के लिए आँखों से देखने के बाद भी विश्वास करना मुश्किल है…
मानव शरीर की हदें असीमित हैं. इसे जानने-समझने के लिए "योग-साधना की शिक्षा" हमारे बुजुर्गों ने हमें विरासत में दी है.#yoga #FitIndia #fitness. pic.twitter.com/sW8XavEb8l— Dipanshu Kabra (@ipskabra) February 24, 2021
दिपांशु काब्राने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले – योग अभ्यासाने या मुलीने आपले शरीर इतके लवचिक केले आहे की डोळ्यांनी पाहिल्यानंतरही विश्वास ठेवणे कठीण आहे. मानवी शरीराच्या मर्यादा अमर्यादित आहेत. ते जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आपल्या वाडवडिलांनी आपल्याला “योग आणि आध्यात्मिक सराव” चा वारसा दिला आहे. दरम्यान या मुलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडियावर लोक त्याला खूप पसंत करत आहेत. त्याच बरोबर योगासनांमुळे शरीराला होणाऱ्या फायद्यांबद्दलही बरेच कमेंट्स करीत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 15000 वेळा पाहिला गेला आहे.