बहुजननामा ऑनलाईन टीम – ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे डॉ. विलास उजवणे (Vilas Ujawane) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःची अशी एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. आता डॉ. विलास उजवणे (Vilas Ujawane) यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून त्यांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन करत पोस्ट शेअर केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
डॉ. विलास उजवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. या आजारात त्यांनी स्वतःची जमा पुंजी संपूर्ण खर्च केली आहे, तर आता पुन्हा त्यांना हृदयाचा दुर्मीळ आजार झाला आहे आणि त्यातच त्यांना कावीळदेखील झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पुढच्या उपचारांसाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत दिली आहे.
राजू कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत डॉ. विलास उजवणे यांना चांगल्या स्वास्थ्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर त्यांच्या बँकेचे डिटेल्सही त्यांनी पोस्टमध्ये शेअर केली आहे.
आजपर्यंत डॉ. विलास उजवणे (Vilas Ujawane) यांनी मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येदेखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Vilas Ujawane | marathi actors vilas ujvane battle with serious illness facebook post viral
हे देखील वाचा :