बहुजननामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. मृण्मयीने (Mrunmayee Deshpande) आपल्या कार्यकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरूनच केली होती. झी मराठीवरील ‘कुंकू’ या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी वेगळी जागा बनवली. त्यानंतर ती ‘अग्निहोत्र’ या मालिकेतदेखील दिसली होती. या दोन्ही मालिकेनंतर तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत प्रेक्षकांची मने वेळोवेळी जिंकली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आता मृण्मयी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. आता ती सन मराठी वाहिनीवरील ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या मालिकेत मृण्मयी खास हजेरी लावणार आहे. मालिकेतील लग्न सोहळ्यात मृण्मयी संगीत सोहळ्यात उपस्थित राहणार आहे. यावेळी मृण्मयीचा धमाल डान्सदेखील पाहायला मिळणार आहे.
‘शाब्बास सुनबाई’ ही मालिका वेळोवेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विचारांच्या विरुद्ध दिशेने संजीवनी आपली वाटचाल कशा पद्धतीने करते याचे चित्रण या मालिकेत दाखवण्यात आले आहे.
‘कट्यार काळजात घुसली’, ‘मोकळा श्वास’, ‘फत्तेशिकस्त’, ‘नटसम्राट’, ‘शिकारी अशा चित्रपटांतून मृण्मयीने (Mrunmayee Deshpande) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
आता मृण्मयीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
मृण्मयी देशपांडेच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाल्यास ती येणाऱ्या काळात अनुपसिंग ठाकूर सोबत ‘बेभान’ या चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटात या दोघांबरोबर संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Mrunmayee Deshpande | mrunmayee deshpande comeback on television will make special entry in shabbas sunbai serial
हे देखील वाचा :
Vilas Ujawane | अभिनेते डॉ. विलास उजवणेंची ‘या’ गंभीर आजाराशी झुंज; पोस्ट शेअर करत दिली माहिती