बहुजननामा ऑनलाइन टीम – अयोध्येत राम मंदिर निर्माणाचे स्वप्न माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे होते, असे म्हणत आता कॉंग्रेसने मंदिर निर्माणासाठी पुढाकार घेतला आहे, गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा(Ram temple in Ayodhya) भूमीपूजन सोहळा झाला. त्यानंतर भाजपाने राम मंदिराचे श्रेय घेत लोकांकडून वर्गणी जमा करायला सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ आता राम मंदिर बांधकामासाठी भोपाळ काँग्रेसने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने पैसे थेट राम मंदिर ट्रस्टच्या खात्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या व्यवहारात पारदर्शकता येईल. याआधीही राम मंदिर निर्माणासाठी अनेकांनी पैसे जमा केले होते. परंतु त्या पैशाचा हिशोब कुठे आहे असा अप्रत्यक्ष टोला कॉंग्रेसने भाजपाला लगावला आहे.
होइहि सोइ जो राम रचि राखा।
को करि तर्क बढ़ावै साखा॥आज न्यू मार्केट में स्थित रामभक्त हनुमान जी के मंदिर में पूजा अर्चना कर प्रभु श्रीराम के भव्य मंदिर के निर्माण हेतु लोगों से सीधे बैंक एकाउंट में दान देने की अपील की॥ pic.twitter.com/yvmmyg0PMr
— P. C. Sharma (@pcsharmainc) January 12, 2021
माजी मंत्री पी सी शर्मा यांच्या नेतृत्त्वातखाली भोपाळमध्ये याची सुरूवात झाली, न्यू मार्केट येथील हनुमान मंदिरात पूजा करून काँग्रेस नेत्यांनी राम मंदिरासाठी लोकांकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. राम मंदिर निर्माणाचे स्वप्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे होते. त्यांनी राम मंदिराचं कुलूप तोडून लोकांना दर्शनासाठी खुले केले होते, असे शर्मा म्हणाले. तुम्ही कोणीही लोकांकडून पैसे गोळा करू नका तर थेट जी रक्कम असेल ती राम मंदिर ट्रस्टच्या खात्यात जमा करा, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस नेत्यांनी पोस्टर्स छापले आहेत. त्यात राम मंदिर ट्रस्टचा खाते क्रमांक दिला आहे.
अयोध्येत उभा राहणारे रामाचे भव्य मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बनत आहे. काही भ्रष्ट लोकांकडे पैसा जाऊ नये यासाठीच मंदिर ट्रस्टच्या खात्यात रक्कम जमा करावी, मध्य प्रदेशात राम मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेकडूनही निधी गोळा करण्याचे काम सुरू आहे. यावेळी अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडले, अशा लोकांना पैसे देऊ नये असे काँग्रेसने सांगितले आहे. लोकांमध्ये याबाबत जागरूकता आणून थेट राम मंदिर ट्रस्टच्या खात्यावर पैसै जमा करण्याचे आवाहन कॉंग्रेसतर्फे केले जात आहे.