बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत (Mumbai) राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी (Marathi) आलंच पाहिजे, असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. मुंबईतील प्रमुख पक्ष असलेल्या मनसे (MNS) आणि शिवसेनेनं (Shivsena) अनेकदा मराठीचा मुद्दा उचलला आहे. परराज्यातून आलेल्या नागरिकांना मराठी संस्कृती आणि भाषा शिकायला भाग पाडलंय. आता भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलु खेळाडू हार्दीक पांड्यांनंही (Hardik Pandya) मुंबईत राहणाऱ्यांना मराठीच बोललं (Speaks marathi) पाहिजे असं सांगितलंय. मी मराठी शिकलो असून मुंबईत राहणाऱ्यांनी मराठीत आपल्या गोष्टी केल्या पाहिजेत, असे हार्दीकने म्हटले आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1337238176499445760
मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कसं काय, हार्दीक भाऊ ? अशी टॅगलाईन देत हार्दीक पांड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दीक चक्क मराठी बोलताना दिसून येत आहे. काय म्हणताय, सगळं बरं का ? नाय नाय आमची मुंबई खूप खूप छान, ये कसा काय पुछतो… तू सांग कसा काय ते… सगळ बरं आहे, इथं धूप खूप हाय. गर्मी तर अहा… काय सांगू तुम्हाला. मी मराठी शिकणार आता, बॉम्बेमध्ये कोई भी मिलना तो मराठीत गोष्टी करा आता, सगळं येतं मला. करतो पण आता आणि प्रॅक्टिसपण इथंच चाललीय, असे संवाद हार्दीकने मराठीत म्हटले आहेत. हार्दीकचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून नेटीझन्सला चांगलाच आवडला आहे.
मला माझ्या बाळाला बघायचं आहे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या व अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर बोलताना पांड्या म्हणाला, मला वाटते की मायदेशी परतायला हवे. आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवायला हवा. मी चार महिन्यांपासून आपल्या बाळाला बघितले नाही. त्यामुळे मी कुटुंबासोबत वेळ घालविण्यास इच्छुक असल्याचे हार्दीक पांड्याने सांगितले.