बहुजननामा ऑनलाइन टीम – वाहनांसाठी (Vehicle) पसंतीचा किंवा आकर्षक नोंदणी क्रमांक (Choice Number) घेण्याकडे अनेकांचा ओढा असतो. पण आता हे क्रमांक महागणार आहेत. चारचाकीसाठी दहा हजारांपासून तब्बल पाच लाखापर्यंत, तर दुचाकीसाठी(Vehicle owners) पाच हजारापासून जास्तीत जास्त एक लाखापर्यंतची रक्कम आकारली जाणार आहे. राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची(Vehicle owners) अधिसूचना काढण्यात आली असून, त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागवण्यात आल्या आहेत.
वाहनांची नवी मालिका जाहीर झाल्यापासून आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मोठी मागणी येत असते. पूर्वी त्यासाठी कार्यालयात गर्दी होत असल्याने चारचाकी किंवा दुचाकीची नवी मालिका जाहीर होण्यापूर्वी आकर्षक क्रमांकासाठी संबंधितांकडून अर्ज मागवले जातात. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक वाहनधारकांची मागणी असल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येतो. ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम देणाऱ्या वाहन धारकास (Vehicle Owner) तो क्रमांक दिला जातो. आकर्षक क्रमांकातून राज्यभरात कोट्यावधी रुपयांचा महसूल शासनाला मिळतो.
राज्याच्या गृह विभागाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या नव्या प्रस्तावानुसार 0001 हा क्रमांक दुचाकीसाठी आता एक लाख तर चारचाकीसाठी 5 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. जो या घडीला दुचाकीला 50 हजार रुपये व चारचाकीला 4 लाखांमध्ये मिळतो. परंतू, राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची अधिसूचना काढण्यात आलेली असली तरी त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागवण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून या हरकती व विचार करुन नव्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.